*जनता प्रतिष्ठानच्यावतीने मोहोळ येथील सावली बंगला येथे गणरायाची प्राणप्रतिष्ठापना धार्मिक वातावरणामध्ये संपन्न!*
*(राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांनी श्री च्या मूर्तींची प्रतिष्ठापना करत आरती करून केली गणेशोत्सवाला सुरुवात)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
आज भाद्रपद महिन्याच्या चैत्र तृतीया श्री गणोशोत्सवाची सुरुवात झाली असून, दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी, गणेशचतुर्थी पासून गणेश उत्सवाची सुरुवात होत असते! याच अनुषंगाने, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या जनता प्रतिष्ठान च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्या “सावली” या निवासस्थानी, श्री गणरायाच्या च्या मूर्तीची अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये, आरती करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली! यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांनी श्रींची मनोभावे पूजा व आरती करून सोलापूर जिल्हा हा दुष्काळमुक्त होऊ दे अशी प्रार्थना केली! यावेळी मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ. प्रज्ञाताई बनसोडे, उमेश दादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक, दिपक तांबवे,प्रमोदजी आतकरे, शीलवंत क्षीरसागर, विठ्ठल सरवदे, सचिन माने, नितीनजी मोटे, याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व कामगार वृंद याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते!
