*पाटकुल येथे २० लाखाच्या विकास कामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न*
*(ज्येष्ठ नेते गणपत ननवरे यांच्या शुभहस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले)*
जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना गटनेते चरणराज चवरे यांच्या विशेष प्रयत्नातून व पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या २० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज पाटकुल येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमासाठी पाटकूल चे जेष्ठ नागरिक *श्री. गणपत ननवरे* यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्ते व गटारीच्या कामांना या निधीतून मार्ग लागणार असून, त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी बोलताना चरणराज चवरे म्हणाले, “पाटकुल गावाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी खेचून आणून प्रत्येक वाडी-वस्तीवरील कामे पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. हे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण केले जाईल.”
या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
