
प्रांताधिकारी मा.सचिन इथापेंचा टाकळी सिकंदर गावांकडून सत्कार!
(भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या हस्ते प्रांताधिकारी सचिन इथापेंचा सन्मान)
महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवस कामकाजाचे या अभियानांतर्गत टाकळी सिकंदर तालुका मोहोळ येथे प्रांताधिकारी मा.सचिन इथापे यांची उपस्थितीत गाव आढावा बैठक संपन्न झाली.
शासनाने घेतलेल्या महसुली निर्णयाबाबत तसेच शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या पाणंद रस्ते तसेच इतर अडचणी जाणून घेतल्या यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या घरी भेट दिली त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस भीमराव वसेकर, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. संग्राम चव्हाण, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव चव्हाण, लोकनेते शुगरचे संचालक अशोक चव्हाण, पोलीस पाटील रामभाऊ वसेकर, प्रगतशील बागायतदार धनंजय चव्हाण, दगडू दाजी डोंगरे, सुनील चव्हाण, धनाजी जाधव आदी गावकरी उपस्थित होते.