खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली येथे भेट!
(सोलापूरसह इतर राज्यातील साखर कारखाने, व पशुधनासाठी विशेष बँकेची केली यावेळी प्रामुख्याने मागणी!)
(यंदा काळात होणाऱ्या उसासाठी ५०० ते ७०० रुपये पर्यंत साखर कारखानदारांना अनुदान मिळावे:- खासदार धनंजय महाडिक)
महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असल्याने सोलापूरसह राज्यातील शेतकरी, साखर कारखाने व पशुधनासाठी विशेष पॅकेज द्या, त्याचबरोते ७०० रुपये केंद्र सरकारने अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणी खासदार धनंजय महाडीक यांनी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. सोलापूर जिल्ह्यातील शेतीची परिस्थिती गंभीर असल्याने तेथे तातडीने मदतीची गरज आहे. दुष्काळाचा परिणाम केवळ शेती उत्पादनावरच नव्हे, तर रब्बी पेरणी आणि पशुपालनावरही दिसू लागला आहे. अपुऱ्या पावसामुळे उसाची उंची, वजन आणि गुणवत्ता घटली असून, चालू गाळप हंगामात सोलापूर विभागातील साखर उतारा सुमारे ७.५ ते ७.७ टक्के इतकाच असेल. उतारा घटल्याने साखर उत्पादन कमी झाले असून, कारखान्यांवर प्रचंड आर्थिक ताण आला आहे. उत्पादन आणि उसाचे वजन घटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, तर कमी उताऱ्यामुळे कारखान्यांचे साखर उत्पादन घटले आहे. त्याच वेळी कारखान्यांना वैधानिक दर आणि करारानुसार शेतकऱ्यांना ऊस बिले द्यावी लागतात. यासाठी केंद्राने प्रतिटन ५०० ते ७०० रुपये विशेष अर्थसाहाय्य करावे.बर गाळप होणाऱ्या ऊसासाठी कारखान्यांना
*खासदार धनंजय महाडीक यांनी केल्या केंद्र सरकारकडे केल्या या मागण्या!*
बाधित जिल्ह्यांत पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना विशेष दुष्काळी मदत पॅकेज द्यावे.
सोलापूरसह इतर बाधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी विशेष अर्थसहाय्य जाहीर करावे.
कारखान्यांना गाळप उसामागे प्रतिटन ५०० ते ७०० रुपये अर्थसहाय्य द्यावे चारा डेपो व जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात!
