*प्रभाग क्रमांक १७ मध्ये बडवे चर झोपडपट्टी येथे लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्ताने सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न!*
*(प्रभाग क्रमांक १७ मध्ये पुन्हा एकदा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या आथक प्रयत्नातून विकास कामांना आली गती)*
*(नगराध्यक्ष डॉ. प्रणिता ताई भालके मनसे नेते दिलीप बापू धोत्रे नगरसेविका सौ माधुरीताई दिलीप धोत्रे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती!)*
————————–
पंढरपूर शहरातील अतिशय महत्त्वाच्या अशा प्रभाग क्रमांक 17 मधील नगरसेविका सौ माधुरीताई दिलीपबापु धोत्रे, यांच्या प्रभागांमध्ये आज बडवेचर झोपडपट्टी येथे सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन लहुजी साळवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे पंढरपूरच्या नगराध्यक्ष सौ.प्रणिताताई भालके, नगरसेवक लोकेश आप्पा यादव, या व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले!
यावेळी प्रभाग क्रमांक 17 मधील जनतेला जी आम्ही जी आश्वासने दिली होती ती आश्वासने आम्ही एक एक करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असून यातीलच एक भाग म्हणून आज प्रभाग क्रमांक 17 मधील बडवेचर झोपडपट्टी येथे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे भूमिपूजन केले असून नागरिकांना होणारा रस्त्याचा त्रास इथून पुढे कमी होणार आहे; इथून पुढे येतील नागरिकांनी अजून काही विकास कामांसाठी आम्हाला सदैव हाक मारावी आम्ही ती करण्यासाठीबद्ध असल्याचे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी येथील नागरिकांना सांगितले!
या उद्घाटन समारंभावेळी नगरसेवक नागेश यादव, श्रीमंत यादव, दुर्याधन यादव दिपक नाईकनवरे दिनेश पांढरे भाऊ साहेब कांबळे, नाथा यादव, प्रसाद यादव, गौरव ओव्हाळ, निलेश माने, राजू देवकुळे, संतोष वाघमारे नागेश खरात, अंबादास वायदंडे,दशरथ यादव इत्यादी उपस्थित होते.
