गरजू शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी चरणराज चवरे यांचा पुढाकार; पेनूरमध्ये ‘आनंदाचा शिधा’ वाटप उत्साहात संपन्न!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सामाजिक बांधिलकीचा उपक्रम
पेनूर येथे गरजू शेतकरी व मायबाप जनतेला मदतीचा हात, जिल्हाप्रमुख जिल्हा परिषद सदस्य गटनेते सोलापूर चरणराज चवरे यांचा स्तुत्य पुढाकार!
—————————————————————
मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे गरजू शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘आनंदाचा शिधा’ वाटप उपक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य चरणराज चवरे यांच्या पुढाकारातून रविवार, दि.१२ रोजी पेनूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू शेतकरी, कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा सामाजिक दृष्टिकोन समोर आला. केवळ राजकीय कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणीच काळामध्ये त्यांच्यासोबत उभा राहणे आपले कर्तव्य आहे आणि शिवसेना म्हणून कायम अडचणीच्या काळात मायबाप सर्वसामान्य जनते सोबत राहणार
