*विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या शिरपेच्या मध्ये मानाचा तुरा रोवला गेला!*
*विठ्ठलराव शिंदे कारखान्यास आर्थिक व्यवस्थापनासाठी पुरस्कार प्रदान-*
*(विक्रम दादा शिंदे व संचालक मंडळाने स्वीकारला केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. या कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली यांचेकडून सन 2024-2025 साठी उच्च साखर उतारा विभागातील आर्थिक व्यवस्थापनासाठीचा तिसरा पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली यांचेकडून सन 2024-2025 साठी उच्च साखर उतारा विभागातील आर्थिक व्यवस्थापनासाठी तिसरा पुरस्कार जाहीर झालेला होता. सदर पुरस्काराचा वितरण समारंभ मंगळवार दि.22/09/2026 रोजी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि.या संस्थेच्या सन 2025-26 चे वार्षिक सर्वसाधारण सभेत पार पडला. या पुरस्काराचे वितरण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा.नितीन गडकरी यांचे शुभहस्ते व केंद्रीय कृषी राज्यमंत्री मा.कृष्णपाल गुर्जर, महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा.बाबासाहेब पाटील तसेच पंजाब, हरियाणा, छत्तीडगड, गुजरात राज्याचे कृषिमंत्री, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष मा.हर्षवर्धन पाटील,कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्या उपस्थितीत करणेत आले.
कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा.आ.बबनदादा शिंदे यांचे कुशल नेतृत्व व मार्गदर्शनाखाली यापूर्वी कारखान्यास चाचणी गळीत हंगामामध्ये विक्रमी ऊस गाळप, उत्तम आर्थिक व्यवस्थापन, उच्चांकी साखर निर्यात, उच्चांकी ऊस गाळप यासाठी देश व राज्यपातळीवरील 28 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
सदर पुरस्कार वितरण समारंभासाठी पंचायत समिती कुर्डूवाडीचे मा.सभापती तथा कारखान्याचे संचालक विक्रमसिंह शिंदे, राजेश खोत, विलास कौलगे, सचिन देशमुख, संजय लोकरे,जितेंद्र गायकवाड,पंडीतराव पाटील,कैलास तोडकरी,राजाराम नाळे, श्रीकांत पाटील,प्रदीप चौगुले, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, जनरल मॅनेजर पोपट येलपले व फायनान्स मॅनेजर दिलीप लव्हटे उपस्थित होते.
