पंढरपुरात मनसेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा ५८ वा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला! प्रभाग क्रमांक १७ मधील गोरगरीब नागरिकांना सातबाराचे वाटप व व वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न भोजन गोरगरिबांच्या वृद्धांच्या आशीर्वादाने माननीय राजसाहेब ठाकरे यांना कुठेतरी संधी मिळावी अशी आमची इच्छा प्रशांतजी गिड्डे
*पंढरपुरात मनसेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा ५८ वा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला*
*(प्रभाग क्रमांक १७ मधील गोरगरीब नागरिकांना सातबाराचे वाटप व व वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न भोजन)*
*(गोरगरिबांच्या वृद्धांच्या आशीर्वादाने माननीय राजसाहेब ठाकरे यांना कुठेतरी संधी मिळावी अशी आमची इच्छा प्रशांतजी गिड्डे)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील नामदेव पायरी येथे विठ्ठलाच्या प्रतीकात्मक प्रतिमेस जलाभिषेक, दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांना लाडू वाटप करण्यात आले. तसेच ज्ञानोबा तुकाराम व राम कृष्ण हरी च्या गजरात वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
दुपारी विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. अपंगांना सायकल वाटप, तसेच वृद्धाश्रम येथे वृद्ध माता-पित्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. यावेळी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
सर्व कार्यक्रमांना मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, तालुकाध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील, पंढरपूर शहराध्यक्ष संतोष कवडे, शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, तालुका उपाध्यक्ष कृष्णा ताड, प्रदीप परचंडे, मोहोळ विधानसभा अध्यक्ष पवन बेदरे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, संतोष वाघमारे, अंबादास वायदंडे, लक्ष्मण रणदिवे, दिनेश पांढरे, अजित ननवरे, अक्षय नेहतराव, मारुती ऐवळे,धनाजी चव्हाण, गणेश चव्हाण, मच्छिंद्र पुजारी,श्रेयश ताड,जमिर सय्यद आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views:13
📢 Pandharpur Wari Yatra 2026 – Official Public Notice