स्वेरीतील विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद -पालक प्रतिनिधी सौ.वैष्णवी कुरणावळ स्वेरीमध्ये ‘इलाईट २ के २२’ कार्यक्रम संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
– ‘विद्यार्थ्यांनी आपले लक्ष प्राध्यापकांच्या अध्यापनाकडे मन:पूर्वक ठेवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार अभ्यास केला तर भविष्य नक्कीच उज्वल होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी सुरवातीपासून कठोर परिश्रम आणि योग्य दिशेने वाटचाल केल्यास ते आपल्या इच्छित ध्येयाला सहजरीत्या गवसणी घालू शकतात. स्पर्धेच्या युगात वावरताना नवनवीन तंत्रज्ञान  आत्मसात करणे आज अत्यंत आवश्यक आहे. त्यातून स्वेरीतील विविध शैक्षणिक उपक्रम पाहता असे लक्षात येते की विद्यार्थ्यांना या उपक्रमांतून योग्य शिक्षण मिळते, ही बाब खूप महत्वाची आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या गुणवत्त्तेला प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळते त्यामुळे स्वेरीतील विद्यार्थ्यांचे आकाशाला गवसणी घालणारे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.’ असे प्रतिपादन पालक प्रतिनिधी सौ.वैष्णवी कुरणावळ  यांनी केले.
        स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागामध्ये ‘इलाईट (इलेक्ट्रॉनिक्स लिडिंग इन टेक्नीकल एनरीचमेंट) २ के २२’ चे आयोजन केले होते. या उपक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.वैष्णवी कुरणावळ हया उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन करत होत्या. दीपप्रज्वलनानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांनी ‘इलाईट २के २२’ या तांत्रिक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. क्षिप्रा कुरणावळ, गिरिधर शेट्टीगर आणि प्रतिक वाळूजकर या विद्यार्थ्यांनी  आपल्या मनोगतातून प्लेसमेंट वेळी आलेला अनुभव सांगितला. यावेळी शिक्षण पूर्ण होण्याअगोदरच अर्थात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एकूण १३२ ऑफर्स लेटर्स मिळालेली आहेत. त्यापैकी तीनपेक्षा अधिक कंपन्यामध्ये स्वेरीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत निवड झालेल्या नितिन गुजरे, वैष्णवी गंगेकर, क्षिप्रा कुरणावळ, गिरिधर शेट्टीगर, हर्षल कदम, ईश्वरी शेळके, आयेशा तांबोळी आणि प्रतिक वाळूजकर या आठ विद्यार्थ्यांचा यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी इलाईट स्टुडन्ट फोरमचे अध्यक्ष सुदर्शन नरसाळे, उपाध्यक्ष ऋतुराज तारापुरकर, सचिवा वैष्णवी वाळके, उपसचिवा स्वराली जोशी, खजिनदार सोनल निकम, सहखजिनदार वैष्णवी देशमुख यांच्या सहकार्याने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यानी संपूर्ण विभाग इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामधील विविध तांत्रिक बाबींनी सुशोभित केलेला होता.  सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी ‘इलाईट’ या तांत्रिक प्रदशर्नाची पाहणी करून इलाईटमधील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांचे कौतुक केले. यावेळी डॉ. व्ही.जी.काळे, इलाईटचे समन्वयक प्रा.अमोल कदम तसेच विभागातील सर्व प्राध्यापक, सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री जोशी व अनमोल कसबे यांनी केले तर विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती यांनी आभार मानले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here