साठे महामंडळाचा निधी हे पुरोगामी संघर्ष परिषदेचे यश महाविकासआघाडीसरकारचे अभिनंदन:-कृष्णाजी गायकवाड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मातंग समाजाच्या आर्थिक विकासासाठी महाराष्ट्रामध्ये ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली होती, परंतु बंद अवस्थेत असलेलं हे महामंडळ १००० कोटी चे भागभांडवल देऊन ते परत चालू करण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर कोरोना च्या काळात लाँकडाऊन मध्ये सुद्धा पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने आंदोलने निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे महा विकास आघाडी सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला म्हणजेच मातंग समाजाच्या आर्थिक विकासासाठी 1000 कोटीचे भागभांडवल दिल्यामुळे समाजाला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे महा विकास आघाडी सरकारचे पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने अभिनंदन करत असल्याचे सोलापूर जिल्हाध्यक्ष (वरिष्ठ) कृष्णाजी गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.
प्रसिद्धीपत्रकात गायकवाड यानी पुढे म्हटले आहे की ,शासनाने मातंग समाजातील निस्वार्थी व समाजाप्रती तळमळ असलेल्या कार्यकर्त्याची अध्यक्षपदी निवड करावी व महामंडळाचा कारभार पारदर्शी ठेवून समाजाच्या पैशात भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषद हे कदापि सहन करणार नाही.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here