शेतमजूर व असंघटीत कामगार सेना स्थापना बाबत खासदार मा.ना.श्री.अरविंद सावंत साहेब यांना निवेदन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शेतमजूर व असंघटीत कामगार सेना स्थापना बाबत खासदार मा.ना.श्री.अरविंद सावंत साहेब यांना निवेदन

 

संपुर्ण महाराष्ट्रातील शेतमजुर व असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व शिवसेना प्रणित अखिल भारतीय कामगार सेना महासंघाच्या नेतृत्वाखाली एकत्रित आणण्यासाठी शेतमजुर व असंघटीत कामगार सेना स्थापनास मान्यता द्यावी . अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी ऑल इंडिया भारतीय कामगार सेना महासंघाचे अध्यक्ष , शिवसेना नेते व खासदार श्री . अरविंद सावंत साहेब यांना देण्यात आले आहे.
मा. अरविंद सावंत साहेब यांना देण्यात आलेल्या निवेदनात शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षापासून विडी , यंत्रमाग व असंघटित कामगार क्षेत्रातील संघटनेचे कामकाज चालू आहे . त्याच बरोबर सर्व कामगारांमध्ये शिवसेना पक्ष रूजविण्याचे कार्य चालू आहे .
शेतात काम करणाऱ्या शेतमजुर स्त्री , पुरुष कामगारांना कुठल्याही प्रकारचे हक्क व कायदे नसल्याने शेतमजुरांचे जीवन अत्यंत गंभीर झाले . असून त्यांना न्याय व कायदेशीर शेतमजुर म्हणून शासनदरबारी होणे गरजेचे आहे . याचा विचार करुन मी विष्णु कारमपुरी (महाराज) सन २०१७ मध्ये शेतमजुर बचाव संघर्ष यात्रा संपूर्ण महाराष्ट्र काढण्यात आले . आणि सन २०१८ मध्ये चला विधानसभेवर भगवा फडकवुया अशी यात्रा काढली . या माध्यमातून शेतमजुरची संघटना बांधली त्यावेळी त्या – त्या जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी , कुठल्याही प्रकारची सहकार्य केले नाही . उलट तुम्ही का ? इकडे आलात शिवसेना भवनातून आदेश घेऊन या असे म्हणून परत पाठवुन दिले .
महाराष्ट्रातील सर्व शेतमजुरांना एकत्र आणून शिवसेना पक्षांच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आणल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत २० ते २५ आमदार शिवसेनेचे जास्त निवडुन येऊ शकतात म्हणजेच शिवसेनेचा स्वंतत्र पणे भगवा फडकल्या शिवाय राहत नाही अशी माझी खात्री आहे . याबाबत मी गेल्या ३ ते ४ वर्षापासून शिवसेनेच्या वरीष्ठ पदाधिकारी म्हणजे मा . अनिल देसाई साहेब , मा . सुर्यकांत महाडिक साहेब व शिवसेना नेते यांना संपर्क साधून व प्रत्यक्ष भेटून शेतमजुर व असंघटीत कामगार सेना स्थापना करणेबाबत विचारले परंतु कोणीही या विषयाकडे गांभीयाने पाहिले नाही .
तरी माननीय आपण शिवसेना नेते या नात्याने शेतमजुर व असंघटीत क्षेत्रात काम करण्यासाठी भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून शेतमजुर व असंघटित कामगार सेना स्थापना करण्यास मान्यता द्यावी . ही नम्र विनंती . असे नमुद करण्यात आले .
सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्यासह विठ्ठल कु-हाडकर , श्रीनिवास चिलवेरी , सैदप्पा जंगडेकर आदि उपस्थित होते .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here