खासदार मुन्नासाहेब महाडिक यांनी शब्द खरा केला! मा. आ‌ प्रशांत परिचारकांच्या विरोधात आ.समाधान आवताडेंना ताकद

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

खासदार मुन्नासाहेब महाडिक यांनी शब्द खरा केला!

मा. आ‌ प्रशांत परिचारकांच्या विरोधात आ.समाधान आवताडेंना ताकद

मंगळवेढा श्री संत दामाजी व भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर मतदार संघात नव्या राजकीय घडामोडी होत होत आहेत. आता भाजप आमदार समाधान आवताडे यांना भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे पाठबळ मिळणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत.

 

सहा महिन्यापूर्वी झालेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आवताडे यांना पराभूत करण्यासाठी भालके व परिचारकांच्या समर्थकांनी एकत्र येत समविचारी आघाडी स्थापन केली होती. या आघाडीला दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्याच्या ऐकून पाठबळ दिले याच समविचारी आघाडीच्या माध्यमातून समाधान आवताडे यांना कारखाना निवडणुकीत पराभूत केले. ही सल अवताडे समर्थकांच्या मनामध्ये राहिले आहे.

 

त्यानंतर टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक व राजन पाटील यांच्या गटाला धनंजय महाडिक यांच्या गटाने पराभूत केले. दोन्ही साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाला पराभूत करण्यासाठी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी अप्रत्यक्षरीत्या मदत केल्याची सल दोन्ही नेत्याला लागून राहिली आहे. यामध्ये आवताडे यांच्या पराभवाला परिचारक गट कारणीभूत ठरला तर महाडिक यांच्या गटाला विजयी होण्यासाठीचा संघर्ष परिचारकामुळे करावा लागला ही सल मनात राहिली त्यामुळे जिथे परिचारक गट असेल तिथे विरोध करण्याची भूमिका महाडिक गटाने स्पष्ट करून दाखवली.

 

दामाजी कारखान्याच्या निवडणुकीनंतर समविचारी गटाने ग्रामपंचायत निवडणुकीत देखील अपेक्षित यश मिळवल्यामुळे मारोळी येथे झालेल्या सत्कार समारंभात भगीरथ भालके यांनी समविचारी आघाडीला का पाठिंबा दिला याचे कारण स्पष्ट केले. त्यामुळे जवळपास मंगळवेढ्यातील या पुढच्या निवडणुका भालके परिचारक समर्थक एकत्रित येऊन लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे महाडिकांनी देखील आता भीमा कारखान्याच्या विजयाच्या सत्कार समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी चेअरमन विश्वराज महाडिक यांनी आवताडे यांच्या संपर्क कार्यालयात येऊन त्याबाबतचे निमंत्रण दिले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here