विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा पहिला हप्ता 2700 रू. दिपावली सणासाठी 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यानचे बील बँकेत वर्ग,दहा दिवसाला पेमेंट देणार आ.बबनराव शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा पहिला हप्ता 2700 रू.

दिपावली सणासाठी 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यानचे बील बँकेत वर्ग,दहा दिवसाला पेमेंट देणार आ.बबनराव शिंदे

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब कारखान्याचा सन 2023-24 चा गाळप हंगाम सुरू झालेला असून या हंगामात गाळपास येणा-या ऊसासाठी पहीला ॲडव्हान्स हप्ता प्रति टन 2700 रूपये प्रमाणे सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांना देण्यात येणार असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

अधिक माहीती देताना आ.बबनराव शिंदे म्हणाले, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याचा सन 2023-24 चा गाळप हंगाम नुकताच सुरू झालेला असून बँकांकडून साखर मालतारण कर्ज खात्यावर मिळणारी उपलब्धता विचारात घेवून या हंगामात गाळपास येणा-या ऊसास पहिला ॲडव्हान्स हप्ता प्रति टन 2700 रूपये प्रमाणे सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांना देण्यात येणार आहे. मागील सन 2021-22 व 2022-23 हंगामात गाळप झालेल्या ऊसास शेतक-यांना 10 दिवसाला ऊस बिल पेमेंट देणारा विठ्ठलराव शिंदे एकमेव कारखाना आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने यापूर्वी प्रत्येक हंगामामध्ये वेळेत ऊस बिले शेतक-यांना व तोडणी वाहतूक बिले वाहन मालकांना दिली असल्याने शेतक-यांचा या कारखान्यावर प्रचंड विश्वास असल्याने अनेक शेतकरी आपला ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडे देण्यास पसंती देत आहेत.

सन 2023 चे दिपावली सणासाठी सन 2023-24 मध्ये युनिट नं.1 व 2 कडे दि.1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान गळीतास आलेल्या ऊसाचे प्रति टन रू.2700/- प्रमाणे बील ऊस पुरवठादारांच्या खात्यावर वर्ग करणेत आले आहे. जाहीर केल्याप्रमाणे दहा दिवसाला ऊस बिल पुरवठादारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. युनिट नं.1 व 2 कडील अधिकारी व कर्मचारी यांना दिपावली सणासाठी 16.66 टक्के बोनस देणेत आलेला असून बोनसची रक्कम कर्मचा-यांना अदा करण्यात आली आहे.

आजपर्यंत सर्व ऊस पुरवठादारांनी कारखान्यास ऊस पुरवठा करून विश्वास दाखविला आहे त्याचप्रमाणे सन 2023-24 गळीत हंगामामध्येही ऊस पुरवठादारांनी त्यांचा सर्व ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्यास पुरवठा करून गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आ.शिंदे यांनी केले.

वजनकाट्या संदर्भात विनाकारण अफवा पसरवू नयेत-

प्रति वर्षी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे सर्व वजनकाटे वैधमापन विभागाकडून तपासणी करण्यात येतात. यापूर्वीही अनेक वेळा जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार भरारी पथकाने कारखान्याचे दोन्ही युनिटच्या सर्व वजनकाट्याची तपासणी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यासमवेत केलेली आहे. याबाबत भरारी पथकाने सर्वसमक्ष पंचनामेही केलेले आहेत. वजन काट्यांमध्ये कोणतीही तफावत आढळून आलेली नाही. सर्व वजनकाटे योग्य असल्याचा त्यांनी अभिप्राय दिलेला आहे. त्यामुळे विनाकारण कारखान्याच्या वजन काट्यांची बदनामी करू नये व त्यासंदर्भात विनाकारण अफवा पसरवू नयेत. ऊस पुरवठादार शेतक-यांनी त्यांचे ऊसाने भरलेल्या वाहनाचे इतर कोणत्याही वजनकाट्यावर वजन करून कारखान्याचे वजनकाट्यावर वजन करून वजनाची खात्री करून घ्यावी असेही संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे म्हणाले.

ऊस तोडणी मजूरांची होणार दिवाळी गोड

प्रतिवर्षी अहमदनगर,बीड, नांदेड,जालना, नंदुरबार, लातुर, हिंगोली इत्यादी भागातून अनेक ऊस तोडणी मजूर ऊस तोडणी कामासाठी विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर येत आहेत. कारखान्याकडील ऊस तोडणी मजूर यांना प्रतिवर्षी कारखान्यामार्फत लाडू व चिवडा या आल्पोहाराचे वाटप करण्यात येत आहे. कारखान्यामार्फत माढा, पंढरपूर, माळशिरस, करमाळा,इंदापूर,मोहोळ,परांडा या तालुक्यात कारखान्यातील नोंदीतील ऊस तोडणीसाठी कार्यरत असलेल्या युनिट नं.1 व युनिट नं.2 कडील ऊस तोडणी मजूरांना गावोगावी ऊस तोडीचे ठिकाणी जाऊन 12 नोव्हेंबर पासून प्रति टोळी 20 किलो लाडू व 10 किलो चिवडा फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. दोन्ही युनिटकडील मिळून अंदाजे 28 ते 30 हजार मजूरांना या फराळाचे वाटप होणार आहे. यासाठी जवळपास 75 ते 80 लाख खर्च अपेक्षीत आहे अशी माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली. कारखान्याच्या या उपक्रमाबद्दल ऊस तोडणी मजूरामध्ये उत्साहाचे वातावरण असून कुटूंबियांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

 

कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सभासद, ऊस पुरवठादार, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार,ऊस तोडणी मजूर, मटेरियल पुरवठादार व अधिकारी कर्मचारी यांना येणा-या दिपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा- आ.बबनराव शिंदे

सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे,सर्व संचालक, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, युनिट नं.2 चे जनरल मॅनेजर एस.आर.यादव व खातेप्रमुख उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here