पंढरपूरातून “बसपा” सभासद नोंदणी अभियान सुरू.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पंढरपूर येथे सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ राज्याचे सचिव अप्पासाहेब लोकरे यांच्या हस्ते करण्यात आला. देशातील तिसऱ्या क्रमांकाची राष्ट्रीय पार्टी म्हणून बहुजन समाज पक्षाची नोंद आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यात बहुजन समाज पक्षाचा जनाधर वाढत आहे. तळागाळापर्यंत बहुजन समाज पार्टीचे जाळे विस्तारित होत आहे. बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावती यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष एडवोकेट संदीप ताजणे यांच्या मार्गदर्शनानुसार बहुजन समाज पार्टीची सभासद नोंदणी अभियान महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदार संघात घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पंढरपूर विधानसभा मतदार संघातून सभासद नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी बूथ स्तरापर्यंत सभासदांची नोंदणी करण्याचे लक्ष सोलापूर जिल्हा युनिटने निश्चित केले आहे, अशी माहिती सभेला संबोधित करताना जिल्हाध्यक्ष मिलिंद बनसोडे यांनी दिली. बामसेफचे ज्येष्ठ मार्गदर्शक एल.एस. सोनकांबळे यांनी सभासद नोंदणी चे महत्व पक्षाच्या वाढीच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे ते पटवून दिले व जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा प्रभारी भालचंद्र कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थितीत जिल्हा महासचिव रवी सर्वगोड, अशोक ताकतोडे, एडवोकेट सागर बनसोडे, संदीप बनसोडे, गौतम साबळे, आगावणे, अजय शेवडे इत्यादीसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here