राष्ट्रीय लोक अदालतीचे 12 मार्चला आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर,दि.18: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे 2022 सालातील पहिली राष्ट्रीय लोकअदालत 12 मार्च 2022 रोजी सोलापूर शहर व तालुक्यातील सर्व न्यायालयात आयोजित केली असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश शशिकांत मोकाशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

            लोकअदालतीमध्ये फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, कलम 138  एन. आय. ॲक्ट, अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, वीज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे, वैवाहिक वादाबाबतची प्रकरणे, भूसंपादन बाबतची प्रकरणे, तसेच बँक, सहकारी बँक, सहकारी पतसंस्था यांच्या वसुलीचे दरखास्त, बँक लवाद दरखास्त प्रलंबीत व दाखलपूर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तडजोडी करुन मिटविणेसाठी ठेवण्यात आलेली आहेत. ज्या पक्षकारांन  लोकअदालतीमध्ये प्रत्यक्षरित्या सहभागी होता येणार नाही, त्यांना आभासी पद्धतीने उपस्थित राहण्यासाठी ऑनलाईन माध्यमाचा वापर केला जाणार आहे. 

            लोकअदालतीमध्ये प्रकरण तडजोडीने मिटल्यास सामाजिक सलोखा वाढीस लागून दोन्ही पक्षकारांना समाधान मिळते. परस्पर संमतीने निवाडा होत असल्याने आपसातील द्वेष आणि कटुता संपुष्टात येते. पक्षकारांचा वेळ आणि पैशाची बचत होते. लोकअदालतीमध्ये निवाड्याविरूद्ध अपिल करण्याची तरतूद नसल्याने प्रकरणाचा कायमचा निर्णय होतो.  

            लोकन्यायालयात सहभागी होताना कोरोना महामारी अनुषंगाने शासनाने दिलेल्या निर्देशांचे  पालन करावे. शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटविणेसाठी हजर राहून लोकअदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन न्यायाधीश श्री. मोकाशी यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here