येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हापरिषद व नगरपरिषद वर भाजपा चा झेंडा फडकवा:विजयकुमार देशमुख

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हापरिषद व नगरपरिषद वर भाजपा चा झेंडा फडकवा:विजयकुमार देशमुख

मोहोळ (तालुका प्रतिनिधी); बूथ स्तरावरचा कार्यकर्ता हेच भाजपचे बलस्थान आहे. तुमच्या सारखे कार्यकर्ते असल्यानेच आम्ही आमदार खासदार होतो. त्यामुळे आगामी सर्वनिवडणूकात यश मिळावं, आणि याच यंत्रणेचा उपयोग करून घेऊन माझ्या शेजारचा मतदारसंघ असलेल्या मोहोळ मधून भाजपचा आमदार निवडून आणा व येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हापरिषद व नगरपरिषद वर भाजपा चा झेंडा फडकवा” असे आवाहन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा कार्यक्रमचे अध्यक्ष आ. विजयकुमार देशमुख (मालक) यांनी केले.
मोहोळ येथे समर्थ बूथ अभियान अंतर्गत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती चे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे, जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, बाळासाहेब पवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पै. प्रकाश घोडके,लोकसेवक संजय क्षीरसागर, तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण, तालुका सरचिटणीस रमेश माने, महेश सोवनी, सतीश पाटील, माजी सभापती सौ. समता गावडे, पं.स. सदस्या डॉ.सौ . प्रतिभा व्यवहारे, समर्थ बूथ अभियानाचे लोकसभा संयोजक सुदर्शन यादव, मोहोळ तालुका संयोजक गणेश झाडे, सहसंयोजक विष्णुपंत चव्हाण, ऑप प्रमुख विशाल डोंगरे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुशिल भैय्या क्षीरसागर यांनी केले. त्यामध्ये त्यांनी या अभियानाची सविस्तर माहिती दिली. मा. शंकरराव वाघमारे यांनी मागच्या निवडणुकांचा आढावा घेऊन बूथ यंत्रणा सक्षम करण्यामुळेच २०१४ ची लोकसभा , मागच्या वेळेसची पदवीधरची निवडणूक कशा यशस्वी ठरल्या त्याची माहिती दिली. यावेळी जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण, औदुंबर वाडदेकर, संजय क्षीरसागर, सौ.समता गावडे, सुदर्शन यादव, गणेश झाडे आदिंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विष्णुपंत चव्हाण यांनी तर आभार तालुका सरचिटणीस महेश सोवनी यांनी मानले. यावेळी कार्यक्रमात प्रदेश भाजपा च्या सुचनेनुसार मोहोळ विधानसभा अध्यक्षपदी मोहोळचे दिलीप रंगनाथ गायकवाड, उपाध्यक्ष पदी फुलचिंचोली चे नामदेव काळे व वडाळा चे युवा नेते चिमणदादा साठे, तसेच मोहोळ तालुका सरचिटणीस पदी मुजीब मुजावर व किसन मोर्चा ता. उपाध्यक्ष पदी आष्टीचे जयराम गुंड यांची निवड करण्यात आली.

यावेळी अभियान माजी तालुकाध्यक्ष संतोष नामदे,रंगनाथ दादा गुरव, तालुका प्रज्ञावंत आघाडीचे अध्यक्ष अविनाश पांढरे, तानाजीराजे बनसोडे, तालुका उपाध्यक्ष माऊली भगरे, तालुका अनु. मोर्चाचे अध्यक्ष दीपक गवळी, युवा नेते रणजित चवरे (पेनूर ),नवनाथ गाढवे,अनिल वसेकर, गुरुराज तागडे , गणेश शिंदे, चंद्रकांत पुजारी, विवेक पाटील , विशाल पवार, सादिक तांबोळी, हरिभाऊ काकडे,बिरुदेव होनमाणे, महावीर पुजारी, विकास वाघमारे, औधुबंर वाघमोडे, संजय वाघमोडे, शशिकांत गावडे, भाजयुमो तालुका सरचिटणीस सागर वाघमारे(सौंदणे), शहाजहान बागवान,संजय वाघमोडे( कामती बु॥), पैलवान भारत आवारे, जगन्नाथ वसेकर, नवनाथ चव्हाण, दीपक पुजारी, आदिंसह २०० ते २२५ बूथ प्रमुख, ४० शक्तीकेंद्र प्रमुख आदीसोबत तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here