ना बच्चू भाऊंनी कार्यकर्त्यांना दिला अचानक आनंदी धक्का.हे पाहून मंत्रालयातील लोक झाले आश्चर्यचकित

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

ना बच्चू भाऊंनी कार्यकर्त्यांना दिला अचानक आनंदी धक्का.हे पाहून मंत्रालयातील लोक झाले आश्चर्यचकित

 

सर्रास आपण अनेक जणांना आपल्या नेत्याचा सेल्फी घेताना पाहतो.कधी सेल्फी काढायला मिळते तर कधी मिळत पण नाही.सर्वांना वाटते की माझा सेल्फी माझ्या नेत्यासोबत असावा.आज उलट घडलं आणि आम्ही आश्चर्य चकित झालो.मंत्रालयात बच्चू भाऊंची आज महत्वाची बैठक होती.बैठक संपल्यानंतर भाऊ कॅबिन च्या बाहेर आले.आणि सुरू झाले मंत्रालयात कामानिमित्त आलेल्यांची कामे. तेही कोण्या कार्यालयात नाही तर मंत्रालयातील कट्ट्यावर.सर्वांची कामे भाऊंनी फोन करून ,निवेदन स्वीकारून पूर्ण केली.तेवढ्यात बच्चू भाऊ वरती प्रेम करणारे अधिकारी ,शेतकरी,तरुण कार्यकर्ते जमा झाले.पुढे काय सर्वांनी भाऊंची सेल्फी काढायला सुरुवात झाली.भाऊंनी सुदधा सर्वांसोबत आदरपूर्वक फोटो काढून दिले.शेवटी आमचा नंबर आला.

आम्ही भाऊ सोबत सेल्फी काढायला लागलो तेव्हा भाऊंची स्वतःच्या हातात मोबाईल घेतला आणि स्वतः भाऊंनी आमच्या सर्वांची सेल्फी घेतली.आम्ही सर्वजण हे पाहून भारावून गेलो..आनंद गगनात मावत नव्हता.चेहऱ्यावर हसू उमलत होते.असा नेता कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सेल्फी काढतो हे पाहून तेथील लोक आवक झाले .हे कसं शक्य झालं.कार्यकर्त्यांमध्ये येवढं मिळून मिसळून जाणारा आमदार कुठे चुकून पण सापडणार नाही? असा प्रश्न सर्वांना पडला .कारण इतर आमदारकडे गार्ड असतात.चहाच्या कॅटल्या गरम असतात,मोकळीक नसते,गर्व असतो ,गुरुर असतो, परंतु अपवाद कदाचित भाऊंन सारखा आमदार पुन्हा होणे नाही याची प्रचिती अनेक वेळा आली त्यापैकी हा क्षण.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here