आंतरराष्ट्रीय रेसर ते प्रसिध्द युट्युबर आणि समाजसेवक कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिकांचा अविस्मरणीय प्रवास

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आंतरराष्ट्रीय रेसर ते प्रसिध्द युट्युबर आणि समाजसेवक कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिकांचा अविस्मरणीय प्रवास

 

कृष्णराज महाडिक हा youtube च्या विश्वातील नवीन तारा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असणारं नाव. फॉर्म्युला 3 विश्वात आपल्या स्पीडने अधिराज्य गाजवणारा हा युवक कोरोनाच्या लाटेत कोल्हापुरात अडकून राहिला पण त्याच्यातील creativty त्याला स्वस्थ बसू देत नव्हती न मग तिथून सुरुवात झाली एका प्रसिद्ध youtuber च्या प्रवासाला. आपल्या मोठ्या भावाच्या सल्ल्याने गमतीगमतीत चालू केलेल्या youtube channel चा कोल्हापूर ते संपूर्ण महाराष्ट्र हा प्रवास काहीसा अविस्मरणीय असाच म्हणावा लागेल. वडील धनंजय, आई अरुंधती, भाऊ पृथ्वीराज, विश्वराज आणि वहिनी वैष्णवी अस एक आदर्श कुटुंब न त्यांच्यात असणारा ताळमेळ महाराष्ट्रातल्या लोकांना भावतोय किंबहुना त्यांना तो प्रचंड आवडू लागलाय असं म्हणायला हरकत नाही. एक उत्तम फॅमिली आणि तितकेच जीवाला जीव देणारे मित्र यांचे व्हिडिओ सध्या youtube वर धुमाकूळ घालत आहेत.

कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा सुपुत्र असणाऱ्या कृष्णराजला घरातून समाजसेवेचे बाळकडू मिळाले. Youtube च्या उत्पनातून रस्त्यावर दिवे विकणाऱ्या आजीकडून खरेदी असो, सामान्य लोकांची दवाखान्याची बिलं भरणे आणि आपल्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर, पुणे आणि मुंबईमधल्या हजारो सामान्य लोकांना धान्याची पॅकेट्स पुरवण्याचा काम कृष्णराजच्या माध्यमातून केलं गेलं. २०२१ च्या महापुरात ज्या सामान्य कुटुंबांच्या घराचं अतोनात नुकसान झालं त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम कृष्णराज आणि त्याच्या youtube वरच्या चाहत्यांनी सुरू केलं आहे आणि त्याला उस्फुर्त पाठिंबा मिळताना दिसतोय.

कृष्णराजच्या youtube वरील krish mahadik या चॅनेल वर आपण त्याचे व्हिडिओ पाहू शकताय व instagram च्या krishnaraajmahadik या अकाऊंट वरून आपण त्याच्या समाजसेवेची माहिती घेऊ शकताय

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here