मोहोळ तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड भाजपाचे नेते संजय क्षीरसागर करणार शरद पवार गटात प्रवेश!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड

भाजपाचे नेते संजय क्षीरसागर करणार शरद पवार गटात प्रवेश!

भाजपात मला गेल्या दहा वर्षा पासुन अपमानास्पद वागणूक, भाजपच्या ग्रामीण व्यवस्थेला कंटाळून भाजपा सोडण्याचा निर्णय.

गेल्या दहा वर्षा पासून भाजपात मला अपमानास्पद वागणूक दिली जाते. भाजपाच्या कठीण काळात मी काम केले. भाजपा मधील जिल्ह्याच्या काही नेत्यांच्या दबावामुळे माझ्यावर कायम अन्याय केला जात आहे. त्यामुळेच मी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादी खा. शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे नेते संजय क्षीरसागर यांनी केला.

दरम्यान पक्ष सोडण्या पूर्वी मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या कडे मला कसा त्रास दिला गेला याचे पुरावे ही दिल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात भाजपाला अडचण होऊ शकते.

या संदर्भात अधिक माहिती देताना क्षीरसागर म्हणाले, गेल्या 25 वर्षापासून जनतेने माझ्यावर प्रेम केले. परंतु त्यांना मी काहीच देऊ शकलो नाही. त्यांच्या उपकाराची उतराई मी कशी करणार? भाजपाने आज पर्यंत मला जनतेसाठी कुठलाच निधी दिला नाही. मला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी मुंबईत तीन-तीन दिवस मला अपॉइंमेंट मिळू दिली नाही.

शेवटी तीन ते चार दिवस मुंबईत राहायचे व परत मोहोळ ला यायचे. माझा भाजपा वर राग नाही, मात्र भाजपाच्या ग्रामीण व्यवस्थेवर माझा राग आहे. मी या बाबत वरिष्ठाकडे अडचण सांगण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला परंतु माझी दखल कुणीच गांभीर्याने घेतली नाही. मी गेल्या पंधरा दिवसा पासून मतदार संघातील 140 गावांचा दौरा केला व जनतेची मते जाणून घेतली. जनतेने मला राष्ट्रवादीच्या खा शरद पवार गटात जाण्याचा सल्ला दिला.

दरम्यान पक्ष प्रवेशा बाबत खा शरद पवार, संजय राऊत, यांच्याशी माझी चर्चा झाली, बैठक ही झाली. मोहोळ विधान सभेची जागा कुणाच्या वाटेला जाणार या बाबत ही चर्चा झाली. मगच पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या 24 तारखे ला मोहोळ येथे खा. शरद पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. त्या मेळाव्यातच मी प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. क्षीरसागर यांच्या या निर्णयामुळे मुळे ऐन निवडणुकीच्या काळात भाजपाला अडचण होऊ शकते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here