मंगळवेढा येथे डॉ.रविंद्र नाईकवाडी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मंगळवेढा येथे डॉ.रविंद्र नाईकवाडी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न!

मंगळवेढा येथे डॉ.रविंद्र नाईकवाडी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने विविध आजारांवर मोफत आरोग्य तपासणी व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजिन करण्यात आले होते.

यावेळी मंगळवेढा शहर व तालुक्यातील जनसामान्य रुग्णांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून त्यामध्ये जवळपास 100 हून अधिक रुग्णांचे मोफत एक्स-रे, अस्थिजन्य, हिमोग्लोबिन, बीएमडी, हाडांचा सार ecg , बीपी, शुगर या व विविध आजाराची मोफत तपासणी करून त्या विषयी माहिती डॉ.अक्षय मरगळे यांनी दिली.

यातील काही रुग्णांना मोफत उपचार शस्त्रक्रिया अस्थिरोग निवारण मोफत केले जाणार आहे.शिधापत्रक धारकांना मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील असेही सांगण्यात आले.या आरोग्य शिबिराचे आयोजन डॉ.रविंद्र बाळासाहेब नाईकवाडी व डॉ.अश्विनी रविंद्र नाईकवाडी यांनी केले असून शहर व तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांना आरोग्याची काळजी व आरोग्य विषयक माहिती अतिशय साध्या व सरळ सोप्या भाषेत समजावले व यासंदर्भात माहिती सांगितली.

 

यावेळी मंगळवेढा सूप्रसिद्ध अस्थी रोग तज्ञ डॉ.अक्षय मरगळे,
डॉ प्रसाद साळे,
डॉ रवींद्र नाईकवाडी,सुप्रसिद्ध
डॉ.विनायक डमकले,
स्त्री रोग तज्ञ डॉ.परेश खंडागळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here