मृत्यूबाबत माहिती असल्यास न्यायालयात साक्ष द्यावी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सहा. अधिक्षक फौजदार न्यायालय, पंढरपुर यांचे आवाहन

पंढरपूर:- (दि.28)-  पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक 08 एप्रिल 2021 रोजी महादेव सुरेश रावताळे यास अटक करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी तब्बेत बिघडल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे मृत्यू झाला आहे. मृत्यूबाबत कोणास काही माहिती असल्यास न्यायालयात साक्ष द्यावी असे, आवाहन सहायक अधिक्षक फौजदार न्यायालय, पंढरपुर यांनी केले आहे.

महादेव सुरेश रावताळे यांची दिनांक 08 एप्रिल 2021 च्या रात्रीच तब्येत बिघडल्यामुळे उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना त्याच दिवशी  पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे पाठविण्यात आले होते. जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे उपचार सुरू असताना रुग्णालयातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रावताळे यांच्या मृत्यूबाबत कोणाला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष काही माहिती असल्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम आर कामत यांच्या न्यायालयात साक्ष द्यावी असे, आवाहन  करण्यात आले आहे .

 सदर तपास न्यायदंडाधिकारी कामत यांच्यामार्फत सुरू असून,  सात दिवसांच्या आत जिल्हा व सत्र न्यायाधीश पंढरपूर इमारतीमध्ये 3 रे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात साक्ष देण्यासाठी हजर राहावे असे, आवाहनही सहायक अधिक्षक फौजदार न्यायालय, पंढरपुर  यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here