कॉंग्रेस व मी इंटकच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार- धवलसिंह मोहिते पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
राज्य वीज कामगार संघटना कॉंग्रेस इंटकचे विविध कार्यक्रम संपन्न.
सोलापूर जिल्हा वीज कामगार इंटक संघटनेच्या वतीने अनेक सामाजिक प्रश्न, कामगारांचे प्रश्न, पक्षीय काम असो असे हिरीरीने भाग घेवून काम करतात. तसेच रक्तदान शिबीर, सामाजिक वृक्षारोपण, कामगारांसाठी पतसंस्था, गृहनिर्माण संस्था इत्यादी त्यांनी उल्लेखनीय कामे केली आहेत त्यामुळे त्यांचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी अहोरात्र खंबीरपणे मी स्वत: व माझा कॉंग्रेस पक्ष आपल्या पाठीशी उभा राहणार आहे, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य वीज कामगार संघटना कॉंग्रेस (इंटक)च्या माध्यमातून अकलूज येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सोलापूर जिल्हा, पंढरपूर, माळशिरस व करमाळा तालुक्यातील नुतन पदाधिकारी यांचा सत्कार  डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. तसेच इंटक संघटनेच्या जिल्हा कार्यालयाचे उद्‌घाटन व उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा इंटक पदाधिकारी यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात आला. तसेच धवलसिंह मोहिते-पाटील यांचा इंटक संघटना, शिवशंकर पतसंस्था, ग्राहक संस्था, इंटकचे महिला प्रतिनिधी, पदाधिकारी सभासद यांच्यावतीने भव्य सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी कॉंग्रेसचे नुतन जिल्हा सरचिटणीस किशोर महाराज जाधव, आण्णासाहेब इनामदार, अण्णासाहेब शिंदे, नानासाहेब पालकर, नवनाथ साठे,  अमरजित पाटील पंढरपूर, प्रतापराव जगताप करमाळा, डॉ.अदिनाथ रूपनवर सांगोला, राजेंद्र रूपनवर, राजाभाऊ गुळवे, रणजितसिंह देशमुख, अभिषेक कांबळे, राजाभाऊ उराडे, नागेश काकडे, ओबीसी महिला सेलच्या ज्योतीताई कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम इंटक संघटनेचे कार्य अध्यक्ष आनंदराव पाखरे, समन्वय समिती अध्यक्ष नागनाथ पांढरे, जनरल सेक्रेटरी राजाराम घुगे, उपजनरल सेक्रेटरी महावीर जाधव, जिल्हा कार्यकारिणी युवराज यलगुलवार, विठ्ठल फड महाराज, जयकुमार वनकुंद्रे, गणेश पवार, विजय शिंदे, राहुल शिंदे, कृष्णदेव काळे, अनिल कोळी, जालिंदर देवकते, मंगला कंडरे, ऐश्वर्या चव्हाण, उर्मिला सपकाळ, सुनिता शेटे, कुबेर बोबडे, सुनिल जुंजकर, संगीता अकोले, लॉरेंस डोंगरे, संतोष चव्हाण, संतोष पवार, सौ. सरगम साठे, विभागीय सेक्रेटरी, उपविभागीय सेक्रेटरी, शिवशंकर पतसंस्था, ग्राहक पतसंस्थेचे संचालक, चेअरमन व महिला प्रतिनिधी तसेच इंटकचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी इंटकमध्ये सतीश ठाकूर, ओमप्रकाश धुमाळे, रामेश्वर गुट्टे, ज्योती गिते, विशाल केंद्रे, अभिजीत ठोंबरे, अनुराधा गिरमे, शितल सगर, गिते वेळापूर, टिपरे पिलीव, ज्ञानेश्वर लोहारे नातेपुते,   परमेश्वर शिंदे व दत्तात्रय रूपनवर, देविदास भिसे, आप्पा कोळी, बलभिम काळे, तुमराम, राहुल ढवळे, शुभम रंजवे, महादेव गवते, सोमनाथ ससाणे, योगेश वावधने, प्रकाश कुट्टेवाड, सिध्देश्वर गुट्टे, गुरूलिंग पाटील, राजेंद्र शिंदे, अदिनाथ गंगणे, ज्ञानेश्वरी नकाते यांनी जाहीर प्रवेश केला.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here