मंगळवेढा शहरामध्ये साकार होणारा टाऊन हॉल म्हणजे वैभवशाली संतनगरीचे प्रतीक- आ समाधान आवताडे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मंगळवेढा शहरामध्ये साकार होणारा टाऊन हॉल म्हणजे वैभवशाली संतनगरीचे प्रतीक- आ समाधान आवताडे

अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंगळवेढा संतनगरीमध्ये साकार होणारा टाऊन हॉल म्हणजे मंगळा संतनगरीचे वैभवशाली प्रतीक असल्याचे प्रतिपादन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे. मंगळवेढा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. त्याचबरोबर मंगळवेढा शहरात साकार होत असलेल्या टाऊन हॉलचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी आमदार आवताडे हे बोलत होते.

आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून निधी मंजूर झालेल्या मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौक ते शनिवार पेठ नगरपालिका हद्दीपर्यंत रस्ता व जुनी बँक ऑफ इंडिया बँकेच्या इमारती पासून मुद्गुल ऑफिस पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी, मंगळवेढा नगरपरिषद अंतर्गत मंगळवेढा नगरपरिषद सुधारित विकास योजना आराखड्यातील आरक्षण क्रमांक १७ मधील बहुउपयोगी हॉल बांधकाम करणे ७ कोटी २४ लाख, नागणेवाडी येथे सात लाख लीटर क्षमतेची आर सी सी उंच टाकी बांधणे भूमिपूजन ६५ लाख, साठे नगर येथील सिटी सर्व्हे क्रमांक २७१ मधील आरक्षण क्रमांक ५६ मधील जागेस संरक्षण भिंत बांधणे व सुशोभीकरण करणे ७४ लाख, मंगळवेढा शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी मंगळवेढा शहरातील सिटी सर्व्हे २७१ या जागेमध्ये साकार होणाऱ्या दिव्यांग भवन ३७ लाख इत्यादी विकास कामांचे त्यांनी भूमिपूजन व लोकार्पण केले आहे.

मंगळवेढा शहरामध्ये साकार होत असलेल्या बहुपयोगी हॉलमुळे विविध राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांसाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. नियोजित या हॉलसाठी तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझी जबाबदारी नेटाने पूर्ण करून तालुक्याच्या वैभवासाठी नक्की प्रयत्न करणार आहे. संतांची भूमी असा लौकिक असणाऱ्या मंगळवेढा भूमीमध्ये उभारणाऱ्या या हॉलमुळे शहराची भौतिक समृद्धता आणखी व्यापक आणि उंचावणारी ठरणार आहे. या हॉल उभारणीमध्ये निधीच्या रूपाने जास्तीत-जास्त योगदान देणार असल्याचेही आमदार आवताडे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

गेल्या दोन वर्षाच्या आमदारकी टर्ममध्ये आतापर्यंत मतदार संघातील विविध विकास बाबींसाठी जनसेवेला केंद्रस्थानी ठेवून आपण १७०० ते १८०० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. यापुढील काळामध्येसुद्धा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण भरघोस निधी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने शासन दरबारी प्रयत्नशील राहून जास्तीत जास्त निधी मतदार संघाच्या पदरी पाडून घेणार असून आपण स्थानिक पातळीवरील कोणत्याही प्रकारचे राजकारण डोक्यामध्ये न ठेवता आपल्या गावाच्या व शहराच्या विकासासाठी माझ्याकडे पाठपुरावा करा मी तुम्हाला भरून निधी देण्यासाठी बांधील असेल असेही आमदार आवताडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दिव्यांग भवन भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आ आवताडे म्हणाले की, कमी बोलणे आणि जास्त काम करणे ही माझी सवय आहे. केवळ बोलाचीच कडी अन बोलाचाच भात न करता गेली दोन वर्षे आपण विकास कामांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या उज्वल निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. दरम्यानच्या काळामध्ये गुणात्मक आणि दर्जात्मक कामासाठी आपण आग्रही होतो. अशी विकासकामे करत असताना कोणत्याही प्रकारचा अर्थिक लोभ अथवा टक्केवारी पद्धत मोडीत काढून केवळ उत्कृष्ट कामासाठी प्राधान्य दिले आहे. कोणत्याही ठेकेदादाराने टक्केवारीसाठी मी पैसे मागितले असे सांगितले तर मी राजकारण सोडून देतो असा परखड विश्वास आ आवताडे यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले की, आ. समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये विकासाचा अमृतकलश येत असताना द्वेष भावनेने काही अपशकुनी लोक या विकास कामांमध्ये खोडा घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत परंतु जनतेच्या विकासाशी बांधील असणारे लोकप्रतिनिधी आ आवताडे यांची ओळख असल्यामुळे त्यांचा हा प्रयत्न कधीही सफल होणार नसल्याचेही प्रा.ढोबळे यांनी ठासून सांगितले आहे.

प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक सरचिटणीस फिरोज मुलाणी हे यावेळी बोलताना म्हणाले की, आपल्या तालुक्यातील बौद्धिकदृष्ट्या कमकुवत व विघ्नसंतोषी असणाऱ्या मंडळींनी संपुष्टात आलेले आपले राजकीय आस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नुसती उठाठेव चालू केली असताना आ आवताडे यांनी सर्वसमावेशक समाजकारण आणि सलोख्याचे राजकारण ही कार्यनीती वापरून कोणत्याही प्रकारे पक्षीय अथवा जातीय राजकारण न करता सामान्य जनतेच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवल्याने त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलत आहे. यापुढील काळामध्येही आ आवताडे यांनी अडगळीला पडलेल्या अशा लोकांना फारसे महत्व न देता विकासाचा रथ असाच गतिमान करावा असेही मुलाणी यांनी सांगितले आहे.

या कार्यक्रमांसाठी माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, जिल्हा लेबर फेडरेशन संचालक सरोजभाई काझी, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, प्रांताधिकारी गजानन गुरव, बी.आर माळी, तहसीलदार मदन जाधव, नगरपरिषद मुख्याधिकारी चरण कोल्हे, पोलीस निरीक्षक रणजीत माने, माजी उपसभापती रमेश भांजे, संचालक तानाजी काकडे, शिवयोगी पुजारी, अशोक केदार, माजी संचालक राजीव बाबर, सचिन शिवशरण, माजी समाजकल्याण सभापती शीलाताई शिवशरण, यशोदा पतसंस्था चेअरमन नीलाताई आटकळे, माजी उपसभापती धनंजय पाटील, जगन्नाथ रेवे, उद्योजक जनार्दन शिवशरण, माजी नगरसेवक महादेव जाधव, भारत नागणे, कैलास कोळी, युवराज शिंदे, प्रमोदकुमार म्हमाणे, सुजित कदम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष युवराज कोळी, प्रताप सावंजी, माजी मि.नगराध्यक्ष सोमनाथ माळी, सचिन शिंदे, फिरोज मुलाणी, चंद्रशेखर कोंडुभैरी, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, खंडू खंदारे, जनार्दन डोरले, बापूसाहेब मेटकरी, डी. सी. जाधव, दिगंबर यादव, नगरपरिषदेचे विनायक साळुंखे, विलास आवताडे, संजय माळी, आदित्य मुदगुल, आनंद मुढे, सरपंच शिवाजी सरगर, जमीर इनामदार, लहु ढगे, संतोष रंदवे आदी तसेच तालुक्याच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्यक्षेत्रातील विविध मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट-
आमचे आमदार समाधान आवताडे यांनी आमदार झाल्यापासून मंगळवेढा तालुक्यातील अपंगांच्या व्यथा अतिशय संवेदनशील पणाने समजून घेत महाराष्ट्र राज्यातील पहिले दिव्यांग भवनाचे भूमिपूजन करून या लढ्याला मोठे यश मिळवून दिले आहे. तालुक्यातील अपंगांच्या सोयीसाठी तालुक्यामध्ये भव्यदिव्य दिव्यांग भवन असावे अशी अनेक दिवसांपासून दिव्यांगांची इच्छा होती ती आता आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून व प्रयत्नातून साकार होत आहे. आमदार आवताडे यांच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या या अपंग भवनामुळे तालुक्यातील अपंग बंधू- भगिनींमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

-समाधान हेंबाडे ( तालुकाध्यक्ष, प्रहार संघटना)

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here