कार्तिक वारी पुर्व तयारी बाबत अप्पर जिल्हाधिकारी जाधव यांच्या कडून पाहणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर, दि. ०१ : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्तिक वारी सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी कार्तिक वारी पुर्व तयारी म्हणून ६५ एकर, चंद्रभागा वाळंवट, पत्राशेड, मंदीर, मंदीर परिसराची अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी पाहणी केली.

यावेळी त्याच्यासमवेत प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलीस निरिक्षक अरुण पवार, नगरअभियंता नेताजी पवार आदी उपस्थित होते.

कार्तिक वारीच्या पुर्वतयारी बाबत ६५ एकर येथे स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, शौचालय दुरुस्ती व स्वच्छता, अखंडीत व सुरक्षित वीज पुरवठा करण्याबाबत व्यवस्था उपलब्ध ठेवावी. चंद्रभागा वाळवंटात स्वच्छता व पुरेसा प्रकाश, सुरक्षिततेच्या द्टीने सी.सी टीव्ही कॅमेरे, नियंत्रण कक्ष, तात्पुरती शौचालय व्यवस्था ,आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत करण्यात येणारी तयारी आदी बाबबतची माहिती घेवून आवश्यक त्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केल्या. तसेच पत्राशेड व दर्शन रांगेमध्ये भाविकांध्ये सामाजिक अंतर राहील याबाबत नियोजन करावे. पत्राशेड येथे वैद्यकीय पथक कार्यरत ठेवावे, अशा सूचनाही श्री.जाधव यांनी यावेळी केल्या.

यावेळी कार्तिक वारी पुर्व तयारी बाबत प्रशासन व मंदीर समितीकडून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती प्रांताधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली तर मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी नगरपालिकेकडून करण्यात आलेल्या व येणाऱ्या कामांबाबत माहिती दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here