*खा. धनंजय महाडिक यांनी पुळुज येथील जिव्हाळ्याच्या माणसांशी साधला आपुलकीने संवाद!*
*( सोडविले ग्रामस्थांचे म चुटकीसरशी प्रश्न!)*
*टाकळी सिकंदर व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी पण मांडल्या खासदारसाहेबांसमोर व्यथा)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक आपल्या पंढरपूर तालुक्यातील मुळगाव पुळुज येथे श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवार निमित्त सुप्रसिद्ध लिंगेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतले. यावेळी सर्व ग्रामस्थांशी आपुलकीने चर्चा केली! दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त त्यांनी श्रीक्षेत्र लिंगेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन सर्वांशी संवाद साधला आहे! यावेळी त्यांनी गावातील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्त्यांची व ग्रामस्थांशी, भक्तांशी संवाद साधला व काही मूलभूत समस्या काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला! यामध्ये त्यांनी प्रामुख्याने गावातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न , रस्ते, पाणी व मंदिर परिसर व वाडी वस्तीवरील हाय मास्ट दिवे बसविण्याबाबत व इतर अनेक प्रश्न ते प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यामध्ये त्यांनी गावातील अनेक प्रश्न बसल्या ठिकाणी चुटकीसरशी सोडवले. टाकळी सिकंदर पुळुज परिसरासाठी अनेक योजना अंतर्गत आपल्याला निधी उपलब्ध करून देता येईल पण त्यासाठी एक आराखडा बनवून माझ्याकडे प्रस्ताव सादर करा असे यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. या प्रश्नांबरोबर त्यांनी गावातील ज्येष्ठांचे दर्शन घेतले. कार्यकर्त्यांशी संवाद साधला! यावेळी त्यांच्यासोबत भीमा परिवाराचे संघटक समन्वयक शिवसेना नेते प्रा. संग्रामदादा चव्हाण, पांडुरंग ताटे, सुनील बळवंत चव्हाण, राजाराम बाबर, किसन बापु जाधव,पांडुरंग श्रीधर ताठे, माणिक बाबर, भारत पाटील, झाकीर मुलाणी, प्रमोद बाबर, पैलवान नितीन निळे, पैलवान अन्सार शेख, पोपट सोनटक्के, सिद्धूबापू अनुसे, कृष्णा जाधव, दत्ता कोरे , प्रमोद बाबर, महादेव आबा बाबर भारत पाटील विश्वास पांढरे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
