पंढरपूर तालुक्यात खळबळ!25 वर्षीय तरूणाची हत्या

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरीतील एका तरुणाचा खून झाल्याचे आढळून आले असून सदर तरुणाचा मृतदेह एका विहिरीत निदर्शनास आला आहे. खुनाच्या या घटनेने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पंढरपूर – कोर्टी रोड परिसरातील वाखरी गावाच्या हद्दीत याकुब शेख यांच्या शेतातील एका विहिरीत पंढरपूर तालुक्यातील एका तरुणाचा मृतदेह आढळला असून त्याच्या कमरेला केशरी रंगाच्या नायलॉन दोरीने दगड बांधून विहिरीत टाकून दिल्याचे दिसून येत आहे. एक मोठा दगड बांधून या २५ वर्षे वयाच्या तरुणाला विहिरीत फेकून दिल्याचे दिसून आले. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले आणि मृतदेहाची पाहणी केली तसेच त्याची ओळख देखील पटविण्यात आली. लखन सुनील गांडुळे असे या तरुणाचे नाव असून तो पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील राहणारा आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अधिक चौकशी आणि तपास सुरु करण्यात आला. शेतमालक आपली शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता ते या विहिरीच्या बाजूला गेले. तेथे एक चप्पल दिसल्यामुळे त्यांनी विहिरीत पहिले असता हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती मिळत आ.हे सदर घटनेबाबत पंढरपूर शहरात चर्चा सुरु झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सदर विहिरीत पाणी अत्यंत कमी होते त्यामुळे ही घटना सहज उघडकीस आली. मृताची ओळख पटली असल्याने पोलिसांनी जलद तपास सुरु केला असून सीसीटीव्ही फुटेज देखील पडताळण्यात येत आहे. या घटनेतील आरोपींच्या मुसक्या लवकर आवळल्या जातील असा पोलिसांना विश्वास आहे. या तरुणाची हत्या नेमकी कुणी आणि कशामुळे केली याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथक देखील नेमलेले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here