खा.धनंजय महाडीक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भरणार उद्या भव्य निकाली कुस्तीचे मैदान! पै. सिकंदर शेख व पै. भूपेंद्र सिंग अजनाला यांच्यात रंगणार “भिमा केसरी” कुस्ती स्पर्धा (चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली माहिती)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

खा.धनंजय महाडीक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भरणार उद्या भव्य निकाली कुस्तीचे मैदान!

पै. सिकंदर शेख व पै. भूपेंद्र सिंग अजनाला यांच्यात रंगणार “भिमा केसरी” कुस्ती स्पर्धा

(चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली माहिती)

संसद रत्न खासदार माननीय धनंजय उर्फ नानासाहेब महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भीमा केसरी भव्य निकाली कुस्तीचे मैदान भरणार असून भीमा सहकारी साखर कारखान्याची चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या संकल्पनेतून मंगळवारी दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी दुपारी तीनच्या सुमारास भीमा कारखाना कार्यस्थळावर भव्य निकाली कुस्त्यांची आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये राज्यातील मातब्बर पैलवान महान भारत केसरी महाराष्ट्र केसरी असे सुप्रसिद्ध पैलवानांची उपस्थिती राहणार आहे या कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये जवळपास 9 लाखा रूपयांची बक्षिसे ठेवण्यात आले आहेत.

 

भीमा केसरी भव्य कुस्ती स्पर्धा च्या माध्यमातून भीमा केसरी या किताबासाठी पैलवान सिकंदर शेख महान भारत केसरी, पैलवान भूपेंद्र सिंग असनाला पंजाब केसरी, भीमा साखर केसरी या किताबासाठी पैलवान माऊली जमदाडे महान भारत केसरी , पैलवान बाला रफिक शेख महाराष्ट्र केसरी, भीमा कामगार केसरी या किताबासाठी पैलवान गणेश जगताप मुंबई महापौर केसरी, पैलवान अक्षय शिंदे भीमा वाहतूक केसरी या किताबासाठी पैलवान महेंद्र गायकवाड विदर्भ केसरी, पैलवान गोरा अजनाला पंजाब युनिव्हर्सिटी बोर्ड मेडल चॅम्पियन, भीमा सभासद केसरी या किताबासाठी पैलवान अक्षय मुंगवडे नॅशनल गोल्ड मेडलिस्ट, पैलवान संतोष जगताप, वस्ताद दत्ता आप्पा वाघमारे अकलूज

 

या ‘भीमा केसरी’ भव्य निकाली कुस्ती स्पर्धेसाठी वस्ताद म्हणून पैलवान दिनानाथ सिंग हिंदकेसरी, पैलवान राम सारंग,

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते, पैलवान अफसर शेख ऑल इंडिया चॅम्पियन, पैलवान रावसाहेब मगर, पैलवान छोटा रावसाहेब मगर महाराष्ट्र केसरी, पैलवान मुन्ना लाल शेख महाराष्ट्र केसरी, पैलवान समाधान घोडके, महाराष्ट्र केसरी, पैलवान मौला शेख उपमहाराष्ट्र केसरी, पैलवान योगेश बोंबाळे महान भारत केसरी, पैलवान भरत मेकाली उपमहाराष्ट्र केसरी, पैलवान अन्सार शेख महाराष्ट्र चॅम्पियन, पैलवान सर्जेराव चवरे सोलापूर जिल्हा तालीम उपाध्यक्ष, पैलवान कुस्ती सम्राट असलम काझी, पैलवान भिवा शेंडगे, पैलवान समाधान पाटील मुंबई महापौर केसरी पैलवान, आसिफ शेख सोलापूर केसरी, पैलवान महादेव चव्हाण सुस्ते, पैलवान सत्यवान घोडके, पैलवान समाधान लोमटे, पैलवान जमीर मुलानी, पैलवान विलास तिरवे, पैलवान अण्णा शेंडगे ,पैलवान आबा देव पुजारी, पैलवान चंद्रकांत काळे, पैलवान मारुती माळी, पैलवान महेंद्र देवकते, पैलवान भीमराव मुळे, पैलवान गणेश वाघमोडे, पैलवान सिद्राम मदने, पैलवान संजय बाबर, पैलवान सुधाकर गायकवाड, पैलवान महादेव येळे हे प्रमुख वस्ताद उपस्थित राहणार आहेत तरी कुस्तीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क शरीफ शेख यांच्याशी संपर्क करण्याचे आव्हान भीमा परिवाराकडून करण्यात आले आहे या भव्य दिव्य निकाली कुस्तीसाठी निवेदक म्हणून धनाजी मदने सर अशोक धोत्रे सर राहणार आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here