पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्यतेलाच्या दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूर शहर महिला काँग्रेसचे केंद्रातील मोदीसरकारच्या विरोधात बोंबा बोंब आंदोलन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्यतेलाच्या दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूर शहर महिला काँग्रेसचे केंद्रातील मोदीसरकारच्या विरोधात बोंबा बोंब आंदोलन

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे या जीवघेण्या महागीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या ताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व आमदार प्रणितीताई शिंदे, शहर काॅग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकारच्या विरुध्द बोंबाबोंब आंदोलन करण्यांत आले.

केंद्रातील मोदी सरकारवर आगपाखड करताना सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर म्हणाल्या कि, आधीच पेट्रोल – डिझेल व इतर जिवनावश्यक वस्तुच्या सतत केलेल्या दरवाढीमुळे सामान्य माणसाचे अंदाजपत्रक कोलमडले आहे या परिस्थितीचा सामना करत असताना केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये भरमसाठ दरवाढ करुन महिला वर्गास सातत्याने तीव्र त्रास भोगावा लागत आहे.

अगोदरच कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे महिला बचत गट,लहान मोठे उद्योग व्यवसाय, कारखाने बंद पडल्यामुळे महिला व युवकांमध्ये बेकारीआली आहे. दि.२० एप्रिल २०२० पासून केंद्र सरकारने गॅस सिलिंडर ची सबसिडी बंद केल्यामुळे नाईलाजास्तव विना अनुदानित गॅस सिलिंडर घेणे अत्यावश्यक झाले आहे. महिन्याच्या सुरवातीलाच घरगुती गॅसच्या किंमतीत २५ रुपये ५० पैशाची दर वाढ करुन सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. आजच्या घडीला घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ८५० /- ची मजल मारली आहे. पुर्वीच्या केंद्रामध्ये असलेल्या काॅग्रेसच्या राजवटीत सर्वसामान्यांना परवडणारा गॅस सिलिंडर ४०० रुपयांमध्ये उपलब्ध होत होता व त्याचे दर स्थिर रहावे म्हणून काॅग्रेस सरकारचे नियंत्रण होते. याउलट केंद्रातील मोदी सरकारच्या महागाईचा भस्मासुर करुन मनमानी कारभारामुळे महिला वर्गामध्ये तीव्र असंतोषाची लाट पसरली आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे.

आधीच कोरोनाच्यासंकटाने जनता त्रस्त झाली आहे. त्यांत महागाईचा भार सहन करावा लागत आहे. मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल मधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे तरी मोदी सरकार गप्पच आहे त्यांनी गेंड्याची कातडी पांघरली आहे . यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी असून गृहिणी मेटाकुटीस आल्या आहेत.

तरी घरगुती गॅस सिलिंडरची भाव वाढ तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली अन्यथा महिला काॅग्रेस तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला व जाहिर निषेद व्यक्त करत महिला कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या नांवाने घोषणाबाजी करत बोंबाबोंब हल्लाबोल करुन देवून परिसर दणाणून सोडला होता. मा.जिल्हाधिका-यांना याबाबतचे निवेदन व त्या सोबत मा.पंतप्रधानाना पाठविणेसाठी शेणाची गौरी देण्यात आली.

या अंदोलनात शहर अध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, माजी महापौर अलकाताई राठोड, अंबादास गुंत्तीकोंड, प्रसिध्दी प्रमुख तिरुपती परकीपंडला, एन.के क्षिरसागर, सोपान थोरात,नालवारअच्चुगटला, महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, विमल जाधव, विणा देवकते, शोभा बोबे, नंदा कांगरे,अंजली मंगोडेकर, शुभांगी लिंगराज,लता गुंगला, जगदेवी कदम, सुनिता होटकर, चंदा काळे, बसंती साळुंके, मुनेराबी शेख, मुमताज तांबोळी, नीता बनसोडे, मीना गायकवाड, अनिता भालेराव, यास्मिन शेख, हालिमा शेख, कल्पना वैनुर, माया गायकवाड,आदि महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here