खा. धनंजय महाडिक हेच भीमा कारखान्याची सत्ता राखणार! (सभासद करणार खासदार साहेबांना पुन्हा एकदा चेअरमन)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून यामुळे या सहकारी साखर कारखान्या वरती आगामी १५ ते २० दिवसानंतर कोणाची सत्ता येणार याची सर्व गाव खेड्यातील सर्व ज्येष्ठ-कनिष्ठ मंडळींमध्ये चर्चा होताना दिसत आहे. भीमा सहकारी साखर कारखाना हा एक सर्वसामान्य सभासदांचा व कामगारांचा साखर कारखाना असून या साखर कारखान्यावरती कोल्हापूरचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक यांची सध्या सत्ता असून हि सत्ता पुन्हा एकदा खासदार धनंजय महाडिक यांच्या ताब्यात राहणार यात तिळमात्र शंका नाही!

2011 नंतर सत्तांतर होऊन कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे ही सत्ता सर्व सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने सोपवली त्यानंतरच्या काळामध्ये कारखान्याच्या एक्सपान्शन तसेच इथेनॉल निर्मितीकडे भर देत खासदार महाडिक यांनी निवडणुकीत दिलेल्या शब्द पाळला आहे! व सर्व सभासद शेतकऱ्यांना संपूर्णपणे न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. विरोधकांनी अडचणी आणलेल्या असताना सुद्धा खासदार धनंजय महाडिक यांनी कुठेही न डगमगता, सर्व अडचणी दूर केल्या असून सर्व सभासद शेतकऱ्यांना शब्द दिल्याप्रमाणे पन्नास रुपये जादा बिल व सर्व समाजात शेतकऱ्यांना सभासद दाराप्रमाणे साखर वाटप करण्यात आले असून व स्वतः धनंजय महाडिक हे राज्यसभेवर खासदार झाल्यामुळे संपूर्णपणे भीमा परिवार व भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सध्या उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.
त्याचप्रमाणे सर्व सभासद शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण असल्यामुळे खासदार महाडिक व त्यांच्या सर्व संचालक मंडळावर पुन्हा एकदा सर्व सभासद शेतकरी विश्वास दाखवतील व खासदार साहेबांना पुन्हा एकदा भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन करतील अशी चर्चा सर्व राजकीय जाणकारातून चर्चिली जात आहे.

त्याचबरोबर खासदार महाडिक यांच्या सोबतीला त्यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक, हे पण सध्या सर्व बारकावे जाणून घेत असून सर्व सभासद शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्या सर्व-अडीअडचणी सोडवण्याच्ये काम करताना दिसत आहेत! त्याचबरोबर त्यांनी स्वतः सर्व गावोगावी जाऊन सर्व सभासद शेतकऱ्यांना दिवाळी सणासाठी फराळाचे वाटप केले आहे. त्यामुळे सर्वच तरुण सभासदांमध्ये त्यांच्याबाबत एक मोठे आकर्षण तयार झाले आहे. त्यांनीही आता, उत्सवात परिषदेच्या माध्यमातून सर्व तिन्ही तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांच्या भेटीगाठी वर भर दिला आहे तीन तारखेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी खासदार धनंजय महाडिक यांच्या सर्व गटातील सभाकडे, सर्व सभासद शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here