मा. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपला मित्र ज.मा.(आप्पा) मोरे यांना वाहिली श्रद्धांजली

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मा. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपला मित्र ज.मा.(आप्पा) मोरे यांना वाहिली श्रद्धांजली

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे सर्वात निकटवर्ती निमगाव केतकी येथील मित्र जगन्नाथ (अप्पा) मोरे यांचे काल (दि.६) ऑक्टोंबर रोजी दुःखद निधन झाले.

जगन्नाथ आप्पा व शरद पवार यांची मैत्री सर्वांना परिचित असून या आपल्या जवळच्या मित्राला श्रद्धांजली वाहण्याकरीता व मोरे कुटुंबाचे सांत्वन करण्याकरीता आज (दि.७)आक्टोंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निमगाव केतकी येथे आले होते.

इंदापूर पंचायत समितीचे पहिले सभापती जगन्नाथराव (आप्पा) मोरे यांच्या निमगाव केतकी येथील व बाबासाहेब पाटील यांच्या लासुर्णे येथील निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दोन्ही कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी राष्ट्रवादी काग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जमा अप्पांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

जगन्नाथराव मोरे व शरद पवार यांची ४६ वर्षांची मैत्री होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पहिले जिल्हा अध्यक्ष होते.शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती. ज.मा (आप्पा) मोरे यांचा हजरजबाबीपणा त्यांची एकनिष्ठता व नेत्यावर असलेले प्रेम या सर्व गोष्टी तालुक्याला माहित होत्या व आपल्या याच गोष्टीमुळे जमा आप्पा यांची एक विशिष्ट ओळख निर्माण झाली होती. आज शरद पवार यांनी जमा आप्पा यांच्या आजारपणा विषयी संपूर्ण माहिती घेतली व मोरे कुटुंबांना दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्ती देवो असे मत त्यांनी व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here