करकंबला जोडणाऱ्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

करकंबला जोडणाऱ्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी

सोलापूर // प्रतिनिधी

करकंब गावाला जोडणारा टेम्भुर्णी पंढरपूर राज्य मार्गावरून गावात येण्यासाठी गावचे प्रवेशद्वार असलेला रस्ता म्हणजे जळोली चौक ते धाकटी वेस आहे या रस्त्यावर येताना एक ओढा असून या ओढ्यावर फार पूर्वीपासून एक जुना पूल आहे त्या पुलाची उंची अगदी कमी आहे काही वर्षांपूर्वी या ओढ्यावर बंधारा बांधला आहे या बंधाऱ्यामुळे आसपासच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली हा बंधारा बांधणे गरजेचे होते परंतु बंधारा बांधतेवेळी या पुलाची उंचीकडे लक्ष न दिल्याने या पुलावर पावसाळ्यात 3 ते 4 महिने पाणी असते या पाण्यातून लोकांना यावे लागते सर्वात गंभीर बाब म्हणजे या बंधाऱ्याजवळ जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे शाळेतील मुलांना या पाण्यातून वाट काढावी लागते अनेक दिवस या पुलावरून पाणी कमी होत नसल्याने वयोवृद्ध नागरिकांना ये जा करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करून व ओढ्यावरील पुलाची उंची वाढवून मिळावी याचे निवेदन आज उप- अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, करकंब यांना देण्यात आले यावेळी अजितसिंह देशमुख,कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस,माढा विधानसभा,अध्यक्ष माढा तालुका पदवीधर राष्ट्रवादी युवक काँग्रेस, प्रकाश काका नागरस, महेश गुजरे, विजय जाधव, अशोक देशमुख, नितीन दुधाळ, शैलेश जवारे, बंडू चंदनशिवे, मिथुन चंदनशिवे,विजयसिंह निकम, अतुल ठोंबरे,संतोष शिंदे, सुरेश सलगर, भैरवनाथ वाफळकर , महादेव शिंदे इत्यादी यावेळी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here