सतीश (दादा) महाडिक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा!
सांगली // प्रतिनिधी
सांगली जिल्ह्याचे किंग मेकर सर्वांचे लाडके कुटुंबप्रमुख नानासाहेब महाडिक मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी इस्लामपूरचे चेअरमन व मा. नगरसेवक,माननीय सतीश दादा महाडीक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम साजरा करण्यात आला त्यांच्या कार्यालयात त्यांच्या हजारो मित्रमंडळींनी समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती वाढदिवसाच्या व औचित्य साधून आज सांगली इस्लामपूर मिरज कुपवाड या भागामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सर्व गोरगरीब नागरिकांना मदत करण्यात आली
या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल दादा महाडीक, महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यसमिती सदस्य मा. सम्राट बाबा महाडिक बाबा यावेळी माजी नगरसेवक मा कपिल ओसवाल, नगरसेवक मा अमित ओसवाल, नगरसेवक मा चेतन शिंदे, महाडिक युवाशक्ती अध्यक्ष मा. सुजित थोरात, प्रा. संजय थोरात,भाजपा विद्यार्थी वाळवा तालुका अध्यक्ष मा प्रवीण चिकुर्डेकर, मन्सूर मोमीन,आर. एम. बागडी, अजित पाटील, अभिमन्यू कदम, अक्षय खिलारे व इतर महाडिक युवाशक्ती चे कार्यकर्ते उपस्थित होते.