सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील भ्रष्ट लिपिक किर्ती देऊळकर यांची अखेर पुण्यात बदली

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील भ्रष्ट लिपिक किर्ती देऊळकर यांची अखेर पुण्यात बदली

 

सोलापुर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांची तडका पडकी बदली मुंबईत झाल्याबरोबर त्यांचे सहकारी बांधकाम कामगार नोंदणी अधिकारी श्रीमती किर्ती देऊळकर यांची ही बदली अप्पर कामगार आयुक्त पुणे यांनी अप्पर कामगार आयुक्त कार्यालय पुणे विभाग पुणे येथे केली असल्याचे आदेश अप्पर कामगार आयुक्त पुणे यांनी दिली आहे , अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी दिली आहे .
सोलापुर सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे , किर्ती देऊळकर या दोघांनी बाहेरील दलालांना हाताशी धरून संघनमताने बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करुन कोट्यावधी रुपयाचा शासकीय पैशाचे अपहार केले आहे . याबाबत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी बांधकाम कामगार नोंदणी बाबत इ गालेल्या भ्रष्टाचार व त्यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपयाचे झालेला आर्थिक नुकसानीस सहाय्यक कामगार आयुक्त श्री . निलेश येलगुंडे व बांधकाम कामगार नोंदणी अधिकारी लिपीक किर्ती देऊळकर हे जबाबदार असुन त्यांच्यावर कारवाई करावी . अशी मागणी करण्यात आली . अशीच मागणी सोलापुरातील अनेक कामगार संघटनांनीही केली . त्यावरुन निलेश येलगुंडे यांची बदली झाल्याबरोबर त्यांचे साथीदार श्रीमती किर्ती देऊळकर यांची ही बदली शासनांनी केली आहे .
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील लिपीक टंक लेखक यांच्या बदलीच्या आदेशात बदलीचे कारण नमुद करतांना अत्यंत गंभीर असे कारणे दिलेली आहेत . व स्पष्टपणे ताबडतोब बदली ठिकाणी रुजु व्हावे असे आदेश देतांना अप्पर कामगार आयुक्त प्रभारी पुणे विभाग पुणे . यांनी दिलेला आदेश असा आहे .
संदर्भीय क्रमांक २ च्या पत्रानुसार खाली नमूद लिपीक – टंकलेखक यांची बदली करण्यात येत आहे .
१. कर्मचाऱ्यांचे नांव – श्रीमती किती देऊळकर , लिपीक – टंकलेखक , सध्याचे कार्यरत ठिकाण – सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय , सो . बदलीनंतर पदस्थापनेचे ठिकाण – अपर कामगार आयुक्त यांचे कार्यालय , पुणे विभाग , पुणे .
श्रीमती किर्ती देऊळकर , लिपीक – टंकलेखक यांना दि . ०६/०८/२०२१ ( मध्यान्होतर ) पासुन सध्याच्या कार्यरत कार्यरत कार्यालयातून या आदेशाद्वारे कार्यमुक्त करण्यात येत आहे . त्यांनी तातडीने बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे . कार्यमुक्तीच्या दिनांकानंतर ते बदली होण्यापुर्वी ज्या ठिकाणी कार्यरत होत त्या ठिकाणावरुन त्यांचे वेतन अथवा कोणतेही देयके अदा करुन नयेत . बदली नंतर संबंधित लिपीक – टंकलेखक बदलीच्या ठिकाणी रुजु होत नसेल तर त्यांच्याविरुध्द नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल .
सदरचे आदेश तात्काळ अंमलात येतील . असे नमुद करण्यात आले आहे . यावरुन सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे व लिपीक श्रीमती किर्ती देऊळकर यांच्या भ्रष्ट कारभाराची आणि बेजबाबदार कामाची नोंद महाराष्ट्र शासनांनी घेतली असल्याची दिसुन येते . निलेश येलगुंडे व श्रीमती किर्ती देऊळकर यांना केवळ बदली आदेश काढुन चालणार नाही . तर त्यांच्यावर बांधकाम कामगार भ्रष्टाचार कारभार व शासनाचे आर्थिक नुकसानीस जबाबदार ठरुन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे . यासाठी आमचा लढा पुढेही चालु राहील असेही पत्रकात विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी नमूद केली आहे .
सोबत :- मा. अप्पर कामगार आयुक्त पुणे, यांचे आदेश पत्र जोडले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here