आवताडे शुगरच्या गाळीत हंगामाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुभारंभ!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आवताडे शुगरच्या गाळीत हंगामाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुभारंभ!

मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथील अवताडे शुगरच्या पहिल्या गळीत हंगामाचा आज दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आहे.

उसाची मोळी टाकून शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुुभहस्ते तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.यामुळे मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील भाजपाची विस्कटलेली मोळी घट्ट करण्याचा प्रयत्न आ.समाधान आवताडे यांच्याकडून करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस हे आ.समाधान आवताडे यांच्या मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघात आज शेतकरी मेळावा देखील घेणार आहेत.त्यामुळे या मेळाव्यास भाजपा आमदार , पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच मंत्रीमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात आ.आवताडे यांना संधी दिली जाणार असल्याची खुमासदार चर्चा रंगत आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने संवाद साधणार आहेत, तर मंगळवेढा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नाबाबात काय घोषणा करतील? याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here