मनसेचे नेते दिलीप बापु धोत्रे यांची भुमिका गुलदस्त्यातच! (बापुच्या भुमिकेकडे सर्वाचे लक्ष)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पंढरपूरसह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ताकत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत मनसेचे नेते दिलीप बापु धोत्रे यांनी गोरगरिबांना आर्थिक मदत तसेच लागेल त्याला पाहिजे ती मदत केली यामुळे तालुक्यात मनसेचे नेते दिलीपबापु धोत्रे यांचा गट मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

अशातच पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच जाहीर झाली. त्याच पार्श्वभूमीवर विठ्ठल कारखान्यासाठी अनेकांच्या भूमिका अस्पष्ट आहे.

यामध्ये स्व भारतनाना भालके यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे नेते, दिलीप बापु धोत्रे,यांची विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी बाबतीत अजून भूमिका अस्पष्ट आहे.

अनेकांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या असून युवराज पाटील, अभिजीत पाटील हे दुस-या बाजूला तर भगिरथ भालके एका बाजूला अशी झुंज होणार हे मात्र नक्की यामध्ये विठ्ठल परिवाराचे एक घटक म्हणून काम पाहिलेले तसेच स्व.भारतनाना भालके यांचे जीवलग मित्र दिलीप बापु धोत्रे यांचीही भुमिका स्पष्ट नाही ते कोणती भूमिका घेणार याकडे ही सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here