राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष यांचा नंदुरबार जिल्हा दौरा संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष यांचा नंदुरबार जिल्हा दौरा संपन्न.

पक्षाचे नवनियुक्त उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री नागेश एकनाथ फाटे हे दिनांक २९ ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत दादा मोरेयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली या बैठकीला नंदुरबार जिल्ह्यातील उद्योजक व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे संघटन बळकट करण्यासाठी श्री नागेश फाटे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे.ते आज नंदुरबार येथे आले असता येथील उद्योजक व व्यापारी यांची साथ घेऊन त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न असून हे सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे असल्याचे त्यांनी या भाषणात नमूद केले व आपण आपल्या अडी अडचणी आम्हाला सांगा त्यांचे निराकरण आम्ही करू असे उपस्थितांना आश्वासन दिले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले जिल्ह्यातील उद्योग व रोजगार मोठा प्रश्न असुन जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळाला पाहीजे आज नंदुरबार येथील तरुण हे उच्च शिक्षण घेऊन रोजगार नसल्याने घरी बसले आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला पाहीजे,नंदुरबार येथील एम.आय.डी.सीला चालना मिळाली पाहीजे तिथे उद्योग उभारले गेले पाहीजे जेणे करुन माझा तरुण बाधंव हा रोजगार प्राप्त करु शकेल यावेळी प्रदेश संपर्क प्रमुख जयसिंग गायकवाड,प्रदेश सरचिटणीस श्री. दिनेश मोरे जी , पंढरपूर ता .उपाध्यक्ष कल्याण कुसूमडे ,नंदुरबार जिल्हा सरचिटणीस श्री.मधुकर पाटील,व्ही.जे.एन.टी प्रदेश उपाध्यक्ष श्री.नरेश पवार, युवा नेते राऊ बाबा मोरे,जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोहन भाऊ शेवाळे,मोहन माळी, जिल्हा चिटणीस श्री.जितेंद्र कोकणी, जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री.रामराव आघाडे,श्री.जगदीश जयस्वाल,श्री.महेंद्र चौधरी,महिला जिल्हाध्यक्ष सौ.अश्विनीताई जोशी,नंदुरबार शहराध्यक्ष श्री.नितीन जगताप, शहादा शहराध्यक्ष श्री.सुरेंद्र कुवर,नंदुरबार तालुका अध्यक्ष श्री.प्रदिप पाटील,शहादा तालुका अध्यक्ष श्री.माधवराव पाटील,तळोदा शहराध्यक्ष श्री.योगेश मराठे,नंदुरबार विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्री. रवींद्र पाटील,ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.केसर सिंह क्षत्रिय,सहकार सेल जिल्हाध्यक्ष श्री.पुरूषोत्तम चव्हाण,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष श्री.संजय खंडारे,सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष श्री.बाळासाहेब मोरे, सेवादल जिल्हाध्यक्ष श्री.रविंद्र जावरे,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे,युवती शहर कार्याध्यक्ष हर्षा देशमुख, महिला जिल्हा चिटणीस प्रतिभा कुलकर्णी,नंदुरबार महिला जिल्हा उपाध्यक्ष कुशल मोरे,उपाध्यक्षा शिलाताई मराठे,शहर अध्यक्ष महिला उषाताई तायडे,युवक जिल्हा उपाध्यक्ष छोटू भाऊ कुवर,युवा शहराध्यक्ष नंदुरबार लल्लाभाऊ मराठे, युवक तालुकाध्यक्ष नंदुरबार सुरेश वळवी,शहादा तालुका महिला अध्यक्ष रेश्मा ताई पवार,जिल्हा सदस्य कांचन मोरे,नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष सोशल मीडिया सेल सुनिल गावित,नंदुरबार शहराध्यक्ष हितेश ढिवरे,महिला शहर उपाध्यक्षा हेमांगी देवरे,वंदना पाटील,सरचिटणीस मोनिका सोनार,संगिता पाटील,प्रतीक पाटील,रुपेश जगताप,मिलिंद जाधव, निलेश चौधरी आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here