
त्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अखेरीस पाणी मिळाले….
शिवसेना नेत्या प्रियांका परांडे यांच्या विशेष प्रयत्नांना यश
मोहोळ तालुक्यातील वटवटे,जामगाव खू तसेच जामगाव बु येथे कॅनॉल ला पाणी सोडले ना गेल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने मोहोळ तहसील समोर वटवटे गावचे समाजसेवक शेतकरी बिरुदेव होनमाने यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे त्या संदर्भात शिवसेना नेते तथा युवासेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य/युवती जिल्हाप्रमुख प्रियंका ताई परांडे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना श्री जयकुमारजी गोरे साहेबांशी चर्चा केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांना फ़ोन केला आणि पालकमंत्री साहेबांच्या आदेशाने तिन्ही गावांना काल दि १५/०५/२०२५ रोजी अधिकाऱ्यांनी सांगितले आणि शेतकऱ्यांनी काल रोजी आंदोलन मागे घेत आनंद व्यक्त केला आणि आज दि १६ /०५/२०२५ रोजी तिन्ही गावांना पाणी सोडण्यात आले.या आंदोलनाला मोहोळचे नेते संजय आण्णा क्षीरसागर,जकराया कारखान्याचे चेअरमन एड.बिराप्पा जाधव इ समाजसेवकानी पाठिंबा दिला होता.या सर्वांचा पाठिंबा तसेच बिरुदेव होनमाने याचे सातत्य आणि प्रियांका ताई परांडे यांचे विशेष प्रयत्न याला आले.