
तीन-जर्सी गायींचा अचानक पाणी पिल्यामुळे मृत्यू!
(स्थानिक लोकप्रतिनिधींकडून परिस्थितीने गरीब असलेल्या सागर बचुटे यांना मदत मिळावी)
मोहोळ तालुक्यातील औंढी येथील तीन ते चार जर्सी गायींचा अचानक पाणी पिल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
परिस्थितीने गरीब कष्टकरी शेतकरी असलेल्या सागर बचुटे यांचा उदरनिर्वाह हा दूध व्यवसायावर आहे. औंढी येथील गोठ्यात बांधलेल्या तीन ते चार जर्सी गायींचा अचानक पाणी पिल्यामुळे मृत्यू झाला यामुळे या कष्टकरी शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले आहे. तरी स्थानिक लोकप्रतिनिधीं कर्तव्यदक्ष गोरगरिबांचे कैवारी समजले जाणारे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ खरे यांच्याकडून या परिस्थितीने गरीब असलेल्या सागर बचुटे परिवारास सर्वतोपरी सहकार्य व आर्थिक मदत मिळावी व त्यांचे झालेले नुकसान भरून निघावे अशी मागणी संपूर्ण त्या भागातीलऔंढी ग्रामस्थांकडून होत आहे.