
विठ्ठल परिवाराची सत्ता पुन्हा एकदा या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांत आणणारच:- भगिरथ भालके
(विरोधकांचा जशास तसे उत्तर देऊ,नाव न घेता केली विरोधकांवर केली टिका…)
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये “विठ्ठल परिवारा बाबत चुकीचा संदेश विरोधक पसरवत आहेत. त्यांना जशास तसे उत्तर दिले जाणार” असे विठ्ठल परिवाराचे नेते भगिरथ भालके यांनी आज पंढरपूर येथे विठ्ठल परिवाराच्या वतीने कार्यकर्त्यांचा जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात होता. त्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
विठ्ठल परिवार हा एकजूट असून या विठ्ठल परिवाराची चुकीची माहिती काही विरोधक मतदारसंघांमध्ये पसरवीत आहेत. अशा विरोधकाला सर्वसामान्य जनतेने व कार्यकर्त्यांनी विरोध करावा. पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे लोकप्रतिनिधी कोट्यवधी रुपये निधी आणून विकास केला. परंतु हा विकास कुठे दिसून येत नाही.अशी टीका देखील भगीरथ भालके यांनी आज रोजी केली.
नुकत्याच झालेल्या आषाढी यात्रेमध्ये पंढरपूर शहरातील तसेच अन्य गावांमधून आलेले फेरीवाले व रस्त्यावर बसून आपली दुकाने थाटणारे गोरगरिबांच्या वर अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांनी त्यांची रोजी रोटी हिसकावून घेण्याचे काम तत्कालीन प्रशासकांनी केले. परंतु या विरोधात आवाज लोकप्रतिनिधी यांनी उठवलेलं नाही. यासर्व सामान्य फेरीवाल्यांच्या व छोट्या मोठ्या व्यापारी, दुकानदारांची बाजू घेऊन आम्ही प्रशासनाच्या विरोधात भांडलो. परंतु त्यावेळी आपल्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी हे मूग गिळून गप्प बसले होते. त्यांना या गोरगरीब लोकांची मताची आवश्यकता नाही असे वाटते. परंतु हेच सर्वसामान्य गोरगरीत जनता त्यांना येत्या विधानसभेमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
सर्वसामान्य जनतेसाठी कै. भारत भालके हे लोकांची अडचणी व समस्या ते तातडीने दखल घेत त्याचा निपटा करीत असे. परंतु सध्याचे लोकप्रतिनिधी या सर्वसामान्य जनतेला दुर्लक्षित करीत आहे.
सध्या काही विरोधक हे काही दिवसापूर्वी मशिदीवर भोंगा लावला म्हणून भोंगा लावू नका म्हणणारे आज त्या विशिष्ट समाजाला अजमेरचे दर्शन घडवून देऊ लागले आहे.असे दुटप्पी भूमिका विरोधक घेत आहेत.
सर्वसामान्य जनता ही एवढी विसरभोळी नाही याची देखील जाणीव या विरोधकांना राहिलेली नाही. अशी टीका त्यांनी नावाचा उल्लेख टाळत मनसे या पक्षावर केला.
विठ्ठल परिवारातील कै. भारत भालके त्याचप्रमाणे वसंतराव दादा काळे यांचे फोटो लावून लोकांची सहानुभूती मिळवू पाहत आहेत. परंतु सर्वसामान्य जनता हुशार आहे.तुमच्या भुलथापांना सर्व सामान्य मतदार भुलनार नाही.
गेली १७ दिवस जन आशीर्वाद या अभियानाच्या अंतर्गत पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेकडो गावांना गाव भेटीचा उपक्रम केल्यानंतर या गाव भेटीच्या दरम्यान जनतेमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या जन आशीर्वाद अभियानाच्या अंतर्गत जनतेकडून येता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बदल आवश्यक आहे.हेच पहावयास मिळत होते. भगीरथ भालके यांनी जमलेल्या मेळाव्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करीत असताना ते म्हणाले आता येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी मिळून एकजुटीने व आपले हेवेदावे गटतट राजकीय जोडे बाजूला सारून एकजूटने काम करावे व आपल्या विठ्ठल परिवाराची सत्ता पुन्हा एकदा या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये आणायची आहे असे भगीरथ भालके म्हणाले.
या विचारविनिमय मेळाव्यात पंढरपूर शहर व पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते व नेते मंडळींनी आपापल्या गावातील अडीअडचणी व त्याचप्रमाणे पाठिंबा सांगत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
——-
पंढरपूर शहरातील कोळी समाजाचे नेते माजी नगराध्यक्ष बाबा अधटराव यांनी पंढरपूर मतदार संघामध्ये साडेचार हजार मतदान हे कोळी समाजाचे असून हे सर्व भगीरथ भालके यांच्या पाठीशी असणार आहे. अशी गावी ग्वाही त्यांनी दिली.
——–
त्याचप्रमाणे पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक सुधीर धोत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना ते म्हणाले की भगीरथ भालके यांनी पंढरपूर शहरांमध्ये जास्तीचे लक्ष देण्यात यावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
——
विठ्ठल परिवाराच्या या विचार विनिमय सोहळ्यात उपस्थित २४ गावांमधील ,पंढरपूर शहरातील कार्यकर्ते व नेते मंडळी व पंढरपूर शहरातील कार्यकर्ते व नेते मंडळी ही उपस्थित होते. याप्रसंगी चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, भोसे येथील गणेश पाटील, युवराज पाटील, पंढरपूरचे नगरसेवक बाबा अधटराव, नगरसेवक सुधीर धोत्रे, महादेव धोत्रे,लखन चौगुले सतीश आप्पा शिंदे, बालाजी मलपे आदी असंख्य विठ्ठल परिवार प्रेमी कार्यकर्ते व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.