
आदर्श बाल व प्राथमिक मंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न!
(मुख्याध्यापिका माया सांगोलकर यांच्या सुनियोजित व्यवस्थापनामुळे, सर्व कार्यक्रम झाले व्यवस्थित)
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आदर्श बाल व प्राथमिक मंदिरे येथे दिनांक 09 व 10 जानेवारी या दिवशी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात वैविध्यपूर्ण गाण्यांची रेलचेल होती. त्यामध्ये कन्नड गीत चन्नाप्पा चन गौडा व कंदे अदर अंते हे तेलगू गीत सादर करण्यात आले.
गाण्यातील मनमोहक संगीत व ठेक्यावर सादरकर्त्यांसह प्रेक्षकही डोलत होते. यासोबतच खंडोबारायाचे याडं बाई या गाण्यातील सादरीकरण व दृश्य सजावट यामुळे प्रेक्षकांना जणू गडावरच असल्यासारखे वाटत होते. बाईपण भारी देवा, दैवत छत्रपती , मी आले, मल्हार मल्हार, लल्लाटी भंडार इ. ६० हून अधिक गाणी कार्यक्रमात झाली. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका माया सांगोलकर, शाखाप्रमुख रजनी देशपांडे, वर्ग शिक्षिका अन्नपूर्णा धायगोंडे नीता तरळगट्टी, सुजाता कुलकर्णी, सोनाली आगावणे, सुवर्णा सपकाळ, सुरेखा शिंदे, संगिता कोकणी, दळवी मॅडम सर्व सहशिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा मुंडे व आशा पाटील यांनी केले.