
सिद्धेश्वर एक्सप्रेस चेन्नई मेल यासह इतर गाड्यांना मुळे ते थांबा मिळावा:खा.धनंजय महाडिक
(खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देत केली मागणी)
(तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण यांच्यामुळे मोहोळ तालुक्यातील नागरिकांची गौरसोय होणार दूर)
कोरोना काळापासून मोहोळ रेल्वे स्थानकावर पूर्वी सर्व थांबत असलेल्या रेल्वे थांबणे बंद झाल्या होत्या. तेव्हापासून मोहोळ रेल्वे स्थानकावर सोलापूर-पुणे पॅसेंजर वगळता कोणतीही रेल्वे थांबत नाहीत.
त्यामुळे मोहोळ शहरासह तालुक्यातून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. पूर्वीप्रमाणे रेल्वे थांबाव्या, अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मोहोळ तालुका व शहर भाजप तसेच व्यापारी संघटना, बार असोसिएशन यांच्या वतीने खासदार धनंजय महाडिक यांना मोहोळ रेल्वे स्थानकावर रेल्वे सर्व रेल्वे थांबा मिळावा यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली होती.
त्याच अनुषंगाने खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मोहोळ येथे रेल्वे थांबा झाल्यास नागरिकांना व व्यापाऱ्यांना लाभ होईल. ५० किलोमीटर सोलापूर आणि कुर्डूवाडीला मोहोळ तालुक्यातील लोकांना जाण्याकरिता अंतर जास्त पडते. त्यामुळे मोहोळ येथे रेल्वे पूर्ववत थांबाव्यात. कोरोना काळापुर्वी मोहोळ रेल्वे स्टेशनवर सिद्धेश्वर एक्सप्रेस, चेन्नई मेल या गाड्या थांबत होत्या. त्या गाड्या पुन्हा मोहोळ रेल्वे स्थानकावर थांबल्या तर मोहोळ येथील व्यापारी वर्गाला मोठा फायदा होणार आहे. यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मकरित्या विचार करू आणि नागरिकांची व व्यापारांची गैरसोय होणार नाही, असे आश्वासित केले असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
कोट
या रेल्वे थांबण्यासाठी विशेषतः मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण यांचे मोठे योगदान असून त्यांच्या समवेत सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सुशील भैया क्षिरसागर, मोहोळ विधानसभा प्रमुख रमेश माने, मुजीफ मुजावर,याचबरोबर इतर सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांनी ही यासाठी मोठे प्रयत्न केले होते यास खासदार धनंजय महाडिक यांनी साथ देत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सदर मागणीचे निवेदन दिले असून यासाठी भाजपा तालुका अध्यक्ष सुनील दादा चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोट
आम्ही यासाठी सर्वपक्षीय निवेदन हे खासदार धनंजय महाडिक यांना दिनांक २७ फेब्रुवारी रोजी दिले होते त्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी त्यांना आमची मागणी होती.तशी खा. धनंजय महाडिक यांनी मागणी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केले आहे लवकर द्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळेल अशी अपेक्षा वाटते.
सुनिलदादा चव्हाण
संचालक भिमा शुगर, तथा, तालुकाध्यक्ष भाजपा मोहोळ