
अँड बादल यादव यांना आदर्श समाज रत्न पुरस्कार जाहीर!
(दिनांक २२ होणार पुरस्काराचे पंढरपूर येथे वितरण)
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे पंढरपूरचे अँडवोकेट बादल यादव यांना ब्ल्यू स्टार सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
सोलापूर जिल्हा व विशेषतः पंढरपूर तालुक्यात विधीक्षेत्रात सर्वसामान्य व गोरगरीब व गरजू नागरिकांना सहकार्य केल्यामुळे या संस्थेने दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर केला असून येत्या २२ तारखेला पंढरपुरात होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार त्यांना मिळाल्याबद्दल पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यातील त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.