*विजयराज दादा डोंगरे यांनी आष्टी जिल्हा परिषद गटासाठी केला उमेदवार अर्ज दाखल!*
*(आष्टी व खंडाळी पंचायत समिती गण मधून अनुक्रमे डॉक्टर अमित व्यवहारे व गणेश मुळे यांनीही अर्ज केला दाखल)*
(यावेळी जेष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील मानाजी बापू माने यांची प्रमुख उपस्थिती)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये आज मोहोळ तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद गटासाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज दादा डोंगरे यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केला असून याचबरोबर आष्टी पंचायत समिती गणासाठी श्री डॉक्टर अमित व्यवहारे खंडाळी पंचायत समिती गणासाठी, गणेश मुळे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. यावेळी मोहोळ शहरांमध्ये सगळीकडे राष्ट्रवादीमय वातावरण झाले होते. विजयराज दादा डोंगरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अर्थ व बांधकाम समिती सभापती म्हणून काम पाहिले असून मोठा अनुभव पाठीशी असणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.. आष्टी जिल्हा परिषद गट हा पारंपारिक डोंगरे परिवाराशी निगडित असून या ठिकाणी पूर्वीपासूनच डोंगरे यांच्या परिवाराचे वर्चस्व राहिले आहे या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मला हमखास खात्री आहे की मी आष्टी जिल्हा परिषद गटातून मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वासही यावेळी पत्रकारांशी बोलताना विजयराज दादा डोंगरे यांनी व्यक्त केला.
या अर्ज भरताना मनोहर भाऊ डोंगरे, अनिल पाटील, संजय तळेकर, सागर थोरात, भारत पावणे, बाळासाहेब पवार, साहेबराव काकडे, सादिक तांबोळी, दीपक गवळी, युवराज ढेरे, महेश हावळे, लखन फडतरे, दादासाहेब शिंदे, गणपत पुदे, रणजीत चवरे, मानाजी माने, सर्जेराव चवरे, संजय पाटील यांसह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
