
शिवसेना नेते विश्वजीत (मुन्ना) भोसले यांची पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्यपदी निवड!
पंढरपूर शहरातील शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते विश्वजीत (मुन्ना) भोसले यांची पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय रुग्णकल्याण समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.
विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांची जनसामान्यांपर्यंत विविध समाज कार्याच्या माध्यमातून कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत. वेळोवेळी सर्व सामान्यांच्या अडचणींला धावून जाणारे, स्थानिक पातळीवर असो किंवा शासकीय पातळीवर कामांचा छडा लावून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देणे असे त्यांचे कार्य आहे.
त्यामुळे विश्वजीत (मुन्ना) भोसले यांच्या समाजकार्याला अजूनही वाव मिळावा त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील अधिकाधिक गोरगरीब रुग्णांची सेवा घडावी या उद्देशाने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय रुग्णकल्याण समितीच्या सदस्यपदी त्यांची ही निवड करण्यात आली.
विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांनी आजपर्यंत त्यांनी पंढरपूर शहरांमध्ये विविध असंख्य सामाजिक उपक्रम राबविले असून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, कोरोना काळातील कार्य तसेच गोरगरिबांचे शासकीय कार्यालयामधील अडीअडचणी व अनेक कामे त्यांनी केलेली आहेत. या निवड झाल्याबद्दल विश्वजीत (मुन्ना) भोसले यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.