सांगोला नगरपरिषद हद्दीत १२ विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर:आ.शहाजीबापू पाटील
सांगोला नगरपरिषदेच्या हद्दीत नागरी सेवा व सुविधेची कामे करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून सांगोला शहरात खुले सभागृह, समाजमंदिर बांधणे, अभ्यासिका बांधणे, रस्ते अशा विविध १२ विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
शहरातील नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी नगर विकास विभागाकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन नगर विकास विभागाने सांगोला नगरपरिषद हद्दीत १२ विकासकामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नगरपरिषदेचे खुले सभागृह बांधणे दोन कोटी रुपये, होलार समाजासाठी नगरपरिषद क्षेत्रात समाज मंदिर व अभ्यासिका बांधणे एक कोटी रुपये, मिरज रोड येथील नाभिक समाज मंदिर येथे पहिला मजला बांधणे ५० लाख रुपये, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ लादीकरण करणे २५ लाख रुपये, बुरुड समाजासाठी समाजमंदिर बांधणे ५० लाख रुपये, नगर परिषद हद्दीतील चांडोलेवाडी, शेंबडे वस्ती येथील अंतर्गत रस्ते विकसित करणे एक कोटी ५० लाख रुपये, मोहन राऊत घर ते बायपास रस्त्यापर्यंत रस्ता खडीकरण व ओढ्यावर सीडी वर्क करणे १ कोटी ७५ लाख रुपये, नगरपरिषद हद्दीतील पंढरपूर रोडवरील देशमुख वस्ती ते बाळासाहेब बनसोडे घर ते कॅनॉल लगत आप्पासाहेब देशमुख घर ते नगरपरिषद हद्दीपर्यंत रस्ता करणे एक कोटी रुपये, जुना सावे रोड पैलवान मंगल कार्यालय तानाजी बिले घर ते माण नदीपर्यंत रस्ता करणे ५० लाख रुपये, वाढेगाव रोड ते भाऊसाहेब पवार वस्तीपर्यंत रस्ता करणे ५० लाख रुपये, चिंचोली रोड इन्नुस मुलाणी वस्ती येथे रस्ता करणे २५ लाख रुपये एखतपूर रोड आरक्षण क्रमांक ६३ अ येथील भाजी मंडई येथे लाधिकरण करणे २५ लाख रुपये अशी अशा १२ विविध विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध करून तातडीने कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.