
सागर चवरे यांच्याकडून ३२ विद्यार्थिनींना सायकलचे मोफत वाटप!
(बाळराजे पाटील यांच्याकडून सामाजिक उपक्रमाचे कौतुक)
छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नागनाथ कॅपीटल लि.बँकेचे चेअरमन सागर मास्तर चवरे यांच्या ३२ व्या वाढदिवसानिमित्त पेनुर येथील ३२ शालेय गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल व शैक्षणिक साहित्य वाटप लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रत्येक वर्षी १९ फेब्रुवारी रोजी पेनूर येथे सागर चवरे मित्रपरिवार मार्फत छत्रपती शिवाजी महाराज जयंती व युवा उद्योजक सागर मास्तर चवरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कामाचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर यावर्षी यांच्या ३२ व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत, गरजू शालेय विद्यार्थिनींना ३२ सायकल ,वह्या व खाऊ वाटप लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच नागनाथ चवरे हे होते.
यावेळी बोलताना बाळराजे पाटील म्हणाले की, सागर चवरे यांच्याकडून प्रत्येकवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, यासह गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप ही बाब स्तुत्य व आदर्शवत असून हे राबवत असलेले उपक्रम समाजाला दिशा देणारे असल्याचे पाटील यांनी सांगितले.
तर सागर चवरे म्हणाले की, पेनुर चे माजी सरपंच नागनाथ चवरे यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांची प्रेरणा घेऊनच मी सामाजिक कामात अग्रेसर असून प्रत्येक वर्षी समाजातील गोरगरीब दीनदुबळ्या लोकांसाठी काहीतरी करीत असतो. यावर्षी ३२ गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप, वह्या व मिठाई वाटप करण्यात आले. यापुढील काळातही पेनुर परिसराच्या विकासासाठी मी कायम अग्रेसर असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते पोपट गणपतराव देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष सर्जेराव चवरे, भाजपाचे निवडणूक प्रमुख रमेश माने, उद्योजक समाधान माने, माजी उपसरपंच रामदास चवरे, सरपंच सुजित आवारे, उद्योजक सुहास आवारे, तानाजी सावंत, मार्केट कमिटी संचालक सज्जन चवरे, भाजपा सरचिटणीस रणजित चवरे, माजी सरपंच हरिश्चंद्र चवरे, भाऊसाहेब सलगर, कार्यकारणी सदस्य विजय कोकाटे, अधिकारी सचिन चवरे, शेतकरी राजाभाऊ सलगर, उद्योजक शिवाजी भोसले, युवा नेते अविनाश कदम, बाबुराव शेळके, देवानंद चवरे, अचित चवरे, सज्जू शेख, रजनीकांत चवरे, आनंद माने, लक्ष्मण चवरे, अमोल जाधव, दिलीप माने, विठ्ठल माने, दादा माळी, धुळा वाघमोडे, शीतल चवरे, देविदास रणदिवे, उद्योजक राजू गवळी, बाळासाहेब गवळी, अमोल चवरे, अनिलराज चवरे, संजय शिंदे, गणेश शेळके, मदन चवरे, अभिराज गवळी सुधीर मांदे, धनाजी चवरे, चिंतामणी माने, सागर तळेकर, विलास माने, कुंडलिक टेकळे, संजय चवरे, बालाजी चव्हाण, युवराज चवरे, रवींद्र क्षीरसागर, आनंद शेळके, नितीन माने, सचिन तांबिले अमित पांढरे, नंदकुमार अवताडे, दिलीप जाधव, सोहम कदम, उमेश उन्हाळे, अशोक जाधव, ओम शेटे आदिंसह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.