
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पंढरपूरातील होळकर वाडा स्वच्छता मोहीम!
(भाजपाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेमध्ये भाजपाच्या दोन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग)
भारतीय जनता पार्टी सोलापूर पूर्व जिल्ह्याच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त पंढरपूर येथील होळकर वाडा,श्री विठ्ठल मंदिर परिसर आणि घाट परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवून,शंखनाद घेऊन महाआरती करण्यात आली.
यावेळी भाजपा नेते,माजी आमदार श्री प्रशांत (मालक) परिचारक , सोलापूर पूर्व जिल्हा भाजपा अध्यक्ष श्री शशिकांत (नाना) चव्हाण ,युवा नेते श्री सोमनाथ अवताडे, युवा नेते श्री प्रणव (मालक) परिचारक , जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे , माऊली भाऊ हळणवर , पंढरपूर ग्रामीण मंडल अध्यक्ष सुभाष मस्के , मोहोळ दक्षिण मंडळ अध्यक्ष रमेश माने, मोहोळ शहर उत्तर मंडल अध्यक्ष सतीश काळे, मंगळवेढा शहराध्यक्ष नागेश डोंगरे ,पंढरपूर शहर अध्यक्ष रोहित पानकर, करकंब मंडल अध्यक्ष श्री हर्षल कदम , श्री बादलसिंह ठाकुर , सिद्धेश्वर कोकरे ,धिरज म्हमाणे , बालाजी वाघमारे, अक्षय वाडकर , ज्येष्ठ नेते बाबासाहेब बडवे, संदिप माने , आदित्य जोशी,प्राजक्त बिनारे , शंकुतला नडगिरे , विश्रांती भूषणार , अपर्णा तारके, सुवर्णा पुजारी, अनुप देवधर, दीनदयाल लिगाडे, माऊली भगरे , लिंगदेव शेंडगे , काकासाहेब यादव , शाशिकांत गावडे , सौदागर खडके , आण्णासाहेब सलगर , पप्पु होनमाने , फंडु गोफणे ,तानाजी पुजारी , मानाजी खरात यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.