
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त श्री राजा लिंगेश्वर मंदिर स्वच्छता,शंखनाद!
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त पुळूज पंचक्रोशीत माहितीपत्रक ग्रामस्थांना वाटप:लिंगराज शेंडगे
धर्मरक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त पुळूज ता.पंढरपूर येथील श्री राजा लिंगेश्वर मंदिर येथे भाजपा मोहोळ दक्षिण ग्रामीणच्या वतीने मंदिर परिसरामध्ये स्वच्छता, शंखनाद व आरती करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.तसेच त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी माहितीपत्रक ग्रामस्थांना वाटप करण्यात केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजू बापू गावडे, मोहोळ तालुका दक्षिण ग्रामीण मंडल अध्यक्ष रमेश माने,प्रदेश निमंत्रित सदस्य संजिव दादा खिलारे,सोलापूर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष लिंगराज शेंडगे,पै.महादेव शेंडगे,विशाल चौधरी, काकासाहेब यादव,साहेबराव घोडके ,कौस्तुभ डोळे, आण्णासाहेब सलगर , सागर भोसले , दिंगबर टेकळे , बालाजी गवळी ,पै.नितीन म्हमाणे, लिंगादेव रंदवे, विजय भोसले , बंडा गडदे,. पुथ्वीराज चव्हाण, अजय होंनकळस. अमोल अंकुशराव आदी उपस्थित होते