पांडुरंग कारखान्याच्या इतिहासातील सर्वोच्च गाळप,साखर उत्पादन व तसेच आसवांनी प्रकल्पाची नोंद झाली आहे:-चेअरमन प्रशांत मालक परिचारक
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या ३,०१,१११ व्या साखर पोत्याचे पूजन!
(कारखान्याने को-जनरेशनमधुन २.०७ को.युनिट विज निर्मिती तर आसवनी प्रकल्पामधुन जवळ जवळ ३६ लाख लिटरचे उत्पादन निर्मिती:- डॉ यशवंतराव कुलकर्णी)
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2024-25 मध्ये उत्पादित झालेल्या 3,01,111 व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक), यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री.कैलास खुळे आणि संचालक व कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व अधिकारी उपस्थीत होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी माहिती दिली की, कारखान्याचा गळीत हंगाम 2024-25 सुरळीत सुरु असून या हंगामात कारखान्याच्या इतिहासातील सर्वोच्च गाळप, सर्वोच्च साखर उत्पादन व सर्वोच्च आसवनी प्रकल्पाच्या उत्पादनाची नोंद झाली आहे. हे ऊस उत्पादक सभासद शेतकरी, कार्यकारी संचालक, अधिकारी, कामगार व संचालक मंडळ इत्यादींनी घेतलेल्या परिश्रामामुळे शक्य झाले आहे.
यावेळी बोलताना कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, या हंगामात कारखान्याचे गाळप अखंडीत सुरु असून कारखान्याकडे नोंदलेला संपुर्ण ऊस वेळेत गाळप केला जाईल. त्याचप्रमाणे गाळप झालेल्या ऊसाचे पेमेंट वेळेत अदा करीत आहोत. या हंगामात कारखान्याचे ४२ दिवसात ३,२६,८९६ मे.टन ऊसाचे गाळप होवून ३,०१,१११ क्विंटल. पोती साखर उत्पादन केली आहेत. को-जनरेशन मधून 2.07 कोटी युनिट विज निर्मीती केली असून आसवनी प्रकल्पामधून 36 लाख लि.उत्पादन घेतले आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक श्री. दिनकरराव मोरे, श्री. उमेशराव परिचारक, श्री.दिलीपराव चव्हाण, श्री.ज्ञानदेव ढोबळे, श्री.तानाजी वाघमोडे, श्री.बाळासो यलमर, श्री.भगवान चौगुले, श्री.लक्ष्मण धनवडे,श्री.भास्कर कसगावडे, श्री.भैरू वाघमारे, श्री.गंगाराम विभुते, श्री.हणमंत कदम श्री.सुदाम मोरे, श्री.विजय जाधव, श्री.किसन सरवदे, श्री.शामराव साळुंखे, श्री.सिताराम शिंदे, श्री.राणू पाटील, तज्ञ संचालक श्री.दाजी पाटील,श्री.दिलीपभाऊ गुरव कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.