
मा.आमदार रामभाऊ सातपुते यांना मोहोळ तालुक्याच्या वतीने सुनील दादा चव्हाण यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मोहोळ तालुक्यातील सर्व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठी ताकद देण्याचे मा.आ.रामभाऊ सातपुते यांनी दिले यावेळी आश्वासन
माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे रामभाऊ सातपुते यांचा दोन दिवसापूर्वी माळशिरस तालुक्यात वाढदिवस मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न झाला. यावेळी त्यांच्या माळशिरस तालुक्यातील मांडवे येथील निवासस्थानी सर्व भारतीय जनता पार्टीच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी दिवसभर त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
या वाढदिवसाचे निमित्ताने दिनांक 5 मार्च रोजी सदाशिवनगर येथे मोठ्या बैलगाडा शर्यतीची ही आयोजन मा. आमदार सातपुते समर्थकांनी आयोजित केले होते..
याप्रसंगी मोहोळ तालुक्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे विद्यमान तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण, भाजपा जिल्हा सरचिटणीस शशिकांत नाना चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुशील भैय्या क्षीरसागर, मोहोळ तालुका सरचिटणीस मुजिफ मुजावर, व इतर सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचा येतोच सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..
प्रसंगी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी मोहोळ तालुक्यात कोणते प्रकारचा कसलाही निधी कमी पडू देणार नसून जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे इतर माध्यमातून येणारा विकास निधी व ताकद सर्व भाजपच्या समर्थक व कार्यकर्त्यांना देण्यात असल्याचे आश्वासन यावेळी माजी आमदार सातपुते यांनी भाजपा तालुका अध्यक्ष सुनील दादा चव्हाण यांना दिला…